News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

चेन्नई एअरपोर्टवरुन 1.34 कोटी जप्त, सर्व नोटा 2000 रुपयांच्या

FOLLOW US: 
Share:
चेन्नई : नोटाबंदीनंतर जुन्य आणि नव्या नोटा जप्तीचं सत्र सुरुच आहे. आयकर विभागाची पथकं देशभरात विविध ठिकाणी छापा टाकत आहे. त्यातच आज पहाटे चेन्नई एअरपोर्टवर 1.34 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व नोटा 2000 रुपयांच्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली असून  त्यांच्याकडून 1 कोटी 34 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. हा पैसा कोणाचा आहे आणि तो  कुठे घेऊन जात होते, याची चौकशी सुरु आहे. तामिळनाडूच्या मुख्य सचिवांच्या घरातून 30 लाखांची रोकड जप्त तामिळनाडूत मागील अनेक दिवसांपासून आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. आयकर विभागाने काल (बुधवार) तामिळनाडूचे मुख्य सचिव राममोहन राव यांच्या अण्णा नगरमधील घरावर छापा टाकला. या छाप्यातून 30 लाख रुपयांच्या नव्या नोटा आणि पाच किलो सोनं जप्त करण्यात आलं. शेखर रेड्डीकडून मिळालेल्या माहितीवरुन हा छापा टाकला होता.

तामिळनाडूच्या मुख्य सचिवांच्या घरावर आयकर विभागाचा छापा

पैसे बदलण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने पैसे बदलण्याच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यावेळी 96 कोटींची रोकड आणि 177 किलो सोनं जप्त केलं होतं. या प्रकरणी आयकर विभागाने श्रीनिवास रेड्डी, शेखर रेड्डी आणि प्रेम यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यानंतर शेखर रेड्डीला अटक करण्यात आली आहे. आयएएस अधिकाऱ्याच्या घरावर छापा, रोकड आणि सोनं हस्तगत दुसरीकडे आयकर विभागाने एका आयएएस अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकून दीड कोटींची रोकड आणि सहा किलो सोनं हस्तगत केलं. तामिळनाडू वेअर हौसिंगचे व्यवस्थापकीय संचालक टी के नागराजन यांच्या घरी हा छापा टाकला होता.

25 कोटींच्या नोटा बदलणाऱ्या व्यावसायिकाला अखेर मुंबईत बेड्या

  25 कोटींच्या नोटा बदलणाऱ्या पारसमल लोढाला बेड्या तब्बल 25 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देणाऱ्या एका व्यावसायिकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पारसमल लोढा असं या व्यावसायिकाचं नाव असून तो मूळ कोलकात्याचा आहे. ईडीने लोढासाठी लूकआऊट नोटीस बजावली होती. लोढानेच कर्नाटकातले उद्योगपती शेखर रेड्डी यांचे 120 कोटी, दिल्लीतला वकिल रोहित टंडन याचे 25 कोटी बदलून दिले होते. लोढा परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी मुंबई विमानतळावर कारवाई केली. रेड्डीना काल सीबीआयने अटक केली होती.
Published at : 22 Dec 2016 11:40 AM (IST) Tags: note ban नोटाबंदी raid छापा

आणखी महत्वाच्या बातम्या

संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल

संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल

गौतम अदानींचा विक्रम! काही तासातच कमावले 73 हजार कोटी रुपये, अदानींच्या एकूण संपत्तीत मोठी वाढ

गौतम अदानींचा विक्रम! काही तासातच कमावले 73 हजार कोटी रुपये, अदानींच्या एकूण संपत्तीत मोठी वाढ

6000 कोटींच्या गैरव्यवहाराचं प्रकरण, जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यात ईडीची दिरंगाई, सुप्रीम कोर्टाने आरोपीला जामीन देऊन टाकला

6000 कोटींच्या गैरव्यवहाराचं प्रकरण, जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यात ईडीची दिरंगाई, सुप्रीम कोर्टाने आरोपीला जामीन देऊन टाकला

50 च्या दशकात संसदेच्या कॅन्टीनमध्ये 50 पैशात मिळायचे जेवण, आता किती रुपयांना मिळते? 70 वर्षात काय झाले बदल?

50 च्या दशकात संसदेच्या कॅन्टीनमध्ये 50 पैशात मिळायचे जेवण, आता किती रुपयांना मिळते? 70 वर्षात काय झाले बदल?

Akhilesh And Dimple Yadav Love Story : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!

Akhilesh And Dimple Yadav Love Story : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!

टॉप न्यूज़

पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!

पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!

Gold Loan : सोने तारण कर्ज 7 महिन्यात 50 टक्क्यांनी वाढलं, NBFC च्या कर्जाकडे पाठ, आरबीआयकडून आकडेवारी जाहीर

Gold Loan : सोने तारण कर्ज 7 महिन्यात  50 टक्क्यांनी वाढलं, NBFC च्या कर्जाकडे पाठ, आरबीआयकडून आकडेवारी जाहीर

मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ

मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ

टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार

टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार