Doctor Suicide : डॉ. अर्चना आत्महत्या प्रकरण; पोलीस अधीक्षकांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
Dr. Archan Sharma Suicide : राजस्थानमधील (Rajasthan) डॉक्टर अर्चना शर्मा यांनी केलेल्या आत्महत्येनंतर (Doctor Suicide) जयपूरमध्ये खासगी रुग्णालयांनी संप पुकारला आहे. या आत्महत्येप्रकरणी पोलीस अधीक्षकांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.
Dr. Archan Sharma Suicide : राजस्थान येथील दौसा जिल्ह्यातील डॉक्टर अर्चना शर्मा यांच्या आत्महत्येविरोधात आज जयपूरमधील खासगी रुग्णालयांनी संप पुकारला आहे. नर्सिंग होम असोसिएशनने या संपाची हाक दिली. त्याशिवाय, कर्तव्य बजावत असलेले डॉक्टर्सदेखील दोन तास काम बंद आंदोलन पुकारणार आहेत. पोलीस अधीक्षकांनी केलेल्या कारवाईमुळे आणि वक्तव्यामुळे डॉ. अर्चना शर्मा यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. पोलीस अधीक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पोलिसांनी केलेल्या एकतर्फी कारवाईमुळे डॉ. अर्चना यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणारे हल्ले, धमकीचे वाढते प्रकरण लक्षात घेता डॉक्टरांना पोलीस संरक्षण मिळायला हवे अशी मागणीही डॉक्टरांनी केली.
डॉ. अर्चना शर्मा यांनी केलेल्या आत्महत्येनंतर राजस्थानमधील डॉक्टरांमध्ये रोष निर्माण झाला आहे. डॉक्टरांच्या संघटनांनी बैठक घेत संप पुकारला. डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. धनंजय यांनी सांगितले की, पोलीस अधीक्षकांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येकावर चांगले आणि यशस्वी उपचार करण्याचा प्रयत्न डॉक्टर करतात. या दरम्यान काही कठीण प्रसंगही उद्भवू शकतात. वैद्यकीय उपचारादरम्यानची परिस्थिती लक्षात न घेता पोलिसांनी डॉक्टर अर्चनाविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप डॉ. धनंजय यांनी केला.
प्रकरण काय?
सोमवारी, दौसा जिल्ह्यातील प्रसुती झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांनी मोठा गदारोळ घातला. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयाचे डॉक्टर सुनित उपाध्याय आणि त्यांची पत्नी डॉ. अर्चना शर्मा विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर संतप्त नातेवाईकांचा रोष कमी झाला. या घटनेनंतर डॉ. अर्चना शर्मा यांनी गळफास घेत आत्महत्या केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Parbhani Crime : वाळू माफियांकडून शेतकऱ्याचा खून, 8 दिवस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, स्वतः पोलीस अधीक्षकांनी गुन्हा नोंदवून घेतला
- Aurangabad Crime : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घातला!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha