दिल्लीत पुढील आदेश येईपर्यंत सर्व शाळा बंद, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे निर्णय
दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे पुढील आदेश होईपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
![दिल्लीत पुढील आदेश येईपर्यंत सर्व शाळा बंद, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे निर्णय Directorate of Education Says Students of any class in Delhi schools not be called in new academic session till further orders दिल्लीत पुढील आदेश येईपर्यंत सर्व शाळा बंद, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/01/26455c10976e965d9c113bc103da103f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे पुढील आदेश होईपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण संचालनालयाने सांगितले की, दिल्लीतील कोणत्याही शाळेतील विद्यार्थ्यांना पुढील आदेश येईपर्यंत नवीन शैक्षणिक सत्रात बोलावले जाणार नाही. 9 वी ते 12 वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षकांचा सल्ला घेऊ शकतात.
आज दिल्लीच्या शाळांमध्ये औपचारिकरित्या नवीन सत्र सुरू झाले. गेल्या वर्षी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन लागू करण्याच्या काही दिवसआधी शाळा बंद करण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये नवीन सत्र अभ्यास ऑनलाइन सुरू झाला आणि यावर्षी एप्रिलमध्येही परिस्थिती अशीच आहे.
इयत्ता 9 वी ते 12 वी (शैक्षणिक सत्र 2020-21) च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या परवानगीनंतर मिड टर्म/प्री बोर्ड/वार्षिक परीक्षा/बोर्डाची परीक्षा/प्रात्यक्षिक परीक्षा/प्रोजेक्ट वर्क/अंतर्गत मूल्यांकन यासाठी शाळेत बोलावले जाऊ शकते.
दिल्लीत गेल्या काही दिवसांत कोरोना प्रकरणात वेगाने वाढत आहे. बुधवारी, कोरोनामध्ये 1,819 लोकांना संसर्ग झाला आणि 11 लोकांचा मृत्यू. आतापर्यंत 6,62,430 लोकांना दिल्लीत कोरोनाची लागण झाली आहे आणि 11,027 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)