कडाक्याच्या थंडीत उघड्यावर आंघोळ करणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याचा फोटो पोस्ट करत दिलजित दोसांज लिहतो..
दिलजित दोसांज (Diljit Dosanjh) याने कडाक्याच्या थंडीत उघड्यावर आंघोळ करत असलेल्या वृद्ध शेतकऱ्याचा फोटो ट्विटर वर शेअर केला आहे.या फोटोवर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. दिलजित दोसांज याने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावरील चर्चेचा विषय झाला आहे.
पंजाबी स्टार दिलजित दोसांज शेतकरी आंदोलनाला सातत्याने पाठिंबा देत आहे. तो सोशल मीडियावर निर्भिडपणे आपली मते मांडण्यास प्रसिद्ध आहे. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ त्याने यापूर्वीच आपले विचार मांडले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री अभिनेत्री कंगनाबरोबर सोशल मीडियावरही त्याचा या विषयावर वादविवादही झाला आहे.
आता दिलजित दोसांज याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, या माध्यमातून आंदोलनावेळी शेतकऱ्यांना किती अडचणींना तोंड द्यावं लागतंय. हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या फोटोवर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. दिलजित दोसांज याने शेअर केलेला फोटो सोशल मीडियावरील चर्चेचा विषय झाला आहे.
Terian Tu Janey Baba ????????
Eh Rab Lok Ena Nu Terrorist Lagde Ne ???????? Insaniyat Naam Di V Koi Cheez Hundi aa Yaar.. pic.twitter.com/TownelIciR — DILJIT DOSANJH (@diljitdosanjh) December 17, 2020
हा फोटो पोस्ट करत त्याने लिहिले, आहे की "तेरीया तू जाने बाबा, यात लोकांना दहशतवादी दिसतात, माणुसकी नावाची पण गोष्ट असते." दिलजितने शेअर केलेल्या फोटोमध्ये कडाक्याच्या थंडीत एक वृद्ध शेतकरी उघड्यावर आंघोळ करताना दिसत आहे. ज्यामध्ये कपडे बाजूच्या ट्रॅक्टरच्या वायरवर लटकलेले दिसतात. आतापर्यंत 7 हजाराहून अधिक लोकांनी हा फोटो रिट्वीट केला आहे. तर 62 हजाराहून अधिक लोकांची याला पसंती मिळाली आहे. दिलजित दोसांझ यांनी ट्विटरव्यतिरिक्त आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे.
या फोटोवर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्यासह अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्वरा भास्करने फोटोवर कॉमेंट करत 'हृदयद्रावक' असं लिहलं आहे.
Heartbreaking ???????? https://t.co/FiLDvBCEkL
— Swara Bhasker (@ReallySwara) December 17, 2020
संबंधित बातमी :
शेतकरी आंदोलनावरुन दिलजीत दोसांज- कंगना रनौत यांच्यात ट्विटर वॉर