एक्स्प्लोर

GST आणि सध्याच्या कर प्रणालीत काय फरक?

नवी दिल्ली : नागरिकांची वेगवेगळ्या करांमधून 1 जुलैपासून सुटका होणार आहे. देशात एकच कर प्रणाली अर्थात जीएसटी लागू होणार आहे. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दिग्गजांच्या उपस्थितीत जीएसटीचं लोकार्पण केलं जाईल. मात्र जीएसटीने सर्वसामान्यांच्या जीवनावर काय परिणाम होईल, सध्याच्या कर प्रणालीमध्ये आणि जीएसटीत काय बदल आहे, जीएसटीने काय फायदा होणार, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडणं स्वाभावीक आहे. जीएसटी आणि सध्याच्या कर प्रणालीत काय फरक? वेगळं राज्य, वेगळा कर हा जीएसटी आणि सध्याच्या कर प्रणालीतला मोठा फरक आहे. प्रत्येक राज्याचे प्रत्येक वस्तूवर वेगळे, त्यावर केंद्राचे वगळे कर सध्या आहेत. मात्र जीएसटीनंतर संपूर्ण देशात एका वस्तूवर एकच कर लागणार आहे. यातून पेट्रोल, डिझेल या वस्तूंना वगळण्यात आलं आहे. म्हणजेच पेट्रोल, डिझेलच्या दरात जीएसटीने काहीही फरक होणार आहे. जीएसटीत किती प्रकारच्या करांचा समावेश? जीएसटीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या अप्रत्यक्ष करांना एकत्र करण्यात आलं आहे. जीएसटीतील केंद्राचे अप्रत्यक्ष कर :
  • केंद्रीय उत्पादन शुल्क (सेंट्रल एक्साईज ड्युटी)
  • अतिरिक्त उत्पादन शुल्क (अॅडिशनल एक्साईज ड्युटी)
  • अतिरिक्त सीमा शुल्क (काऊंटरव्हेलिंग ड्युटी/सीव्हीडी)
  • विशेष अतिरिक्त सीमा शुल्क (स्पेशल अॅडिशनल ड्युटी ऑफ कस्टम)
  • सेवा कर आणि सामान्य सेवांवर लागणारे वेगवेगळे सेस आणि सरचार्ज
जीएसटीतील राज्यांचे अप्रत्यक्ष कर
  • व्हॅट
  • सेंट्रल सेल्स टॅक्स
  • लग्झरी टॅक्स
  • प्रवेश शुल्क (एंट्री टॅक्स)
  • मनोरंजन कर (स्थानिक स्वराज्य संस्थांकडून लावले जाणार कर वगळता)
  • जाहिरात कर
  • खरेदी कर
  • लॉटरी, सट्टेबाजी आणि जुगारावर लावला जाणारा कर
  • राज्यांचे वेगवेगळ्या वस्तूंवरील सेस आणि सरचार्ज
जीएसटीनंतर काय होणार? जीएसटी आणि सध्याची अप्रत्यक्ष कर व्यवस्था सर्वात मोठा फरक हा आहे की, सध्या प्रत्येक स्तरावर वेगवेगळा कर लावला जातो. सर्वसामान्य या कर प्रणालीमध्ये नेहमी भरडला जातो. मात्र जीएसटीनंतर केवळ ग्राहकावर कर लावला जाणार असून वेगवेगळ्या स्तरावरील कर रद्द करण्यात येणार आहे. सध्याची कर प्रणाली कशी काम करते? 100 रुपयांची वस्तू त्यावरील कर
  • सेंट्रल सेल्स टॅक्स - 2 टक्के
  • एंट्री टॅक्स - 2 टक्के
  • एक्साईज ड्युटी - 12.5 टक्के
  • व्हॅट - 14.5 टक्के
  • सर्व्हिस टॅक्स - 1 टक्का
  • एकूण कर - 32 टक्के
म्हणजेच 100 रुपयांच्या वस्तूची किंमत 132 रुपये सध्याच्या कर प्रणालीत 100 रुपयांची वस्तू कंपनीच्या बाहेर निघताच त्यावर 12.5 टक्के एक्साईज ड्युटी लागते, म्हणजे तिची किंमत 112.5 रुपये होते. त्यानंतर त्या वस्तूवर 14.5 टक्के टॅक्स लागल्यानंतर ती वस्तू आणखी महाग होते. हा सर्व टॅक्स विक्रेता किंवा निर्मात्याला नव्हे, तर ग्राहकांना द्यावा लागतो. जीएसटीनंतर कसा टॅक्स लागणार?
  • वस्तूची किंमत - 100 रुपये
  • जीएसटी - 28 टक्के
  • एकूण किंमत - 128 रुपये
जीएसटीमध्ये 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के असे टॅक्स स्लॅब ठेवण्यात आले आहेत. उदाहरणार्थ सर्वात महागडा टॅक्स स्लॅब घेऊन कर रचना केली तरीही अगोदरच्या तुलनेत ती स्वस्त असल्याचं दिसतं. संबंधित बातम्या :

जीएसटी लागू होण्यापूर्वी आज मध्यरात्री हॉटेल बंद राहणार!

महिला बचत गटाच्या सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी नाही : सरकार

जीएसटी लागू झाल्यानंतर या वस्तू महागणार!

जीएसटी कराविरोधात चित्रपट महामंडळ संपाच्या तयारीत

सोनं आणि हिऱ्यावर 3 टक्के जीएसटी, 1 जुलैपासून जीएसटी लागू

जीएसटी मंजुरीमुळे ‘मातोश्री’ला काय मिळणार? : वळसे-पाटील

जमीन आणि घरभाड्यावर जीएसटी लागणार!

कीर्तनकार, भागवत कथाकारांनाही जीएसटी, कररचनेत बदल

जीएसटी आल्यानं नेमका फायदा काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget