Dhirendra Shastri: बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांना हत्येची धमकी; आरोपी अटकेत
उत्तर प्रदेशच्या बरेली पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, हाफिजगंज पोलीस स्टेशन परिसरातील रिथोरा येथील रहिवासी अनस अन्सारी याने इंस्टाग्रामवर धीरेंद्र शास्त्रींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील एका तरुणाने सोशल मीडियावरुन धीरेंद्र शास्त्रींना (Dhirendra Shastri) जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आरोपीने इन्स्टाग्रामवरुन धमकीची पोस्ट केली आहे. हाफिजगंज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी रविवारी बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एफआयआर नोंदवून आरोपीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हाफिजगंज पोलीस स्टेशन परिसरातील रिठोरा येथील रहिवासी अनस अन्सारी याने इन्स्टाग्रामवर धमकी देणारी पोस्ट लिहिली होती. ज्याच त्याने म्हटलं की, बाबाचा मृत्यू जवळ येत आहे.
पोलिसांनी या कलमान्वये केला गुन्हा दाखल
बरेलीचे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) राज कुमार अग्रवाल यांनी सांगितल्याप्रमाणे, हाफिजगंज पोलीस स्टेशन हद्दीतील रिथोरा येथील रहिवासी अनस अन्सारी याने इन्स्टाग्रामवरुन धीरेंद्र शास्त्रींना जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 295A (जाणूनबुजून धार्मिक भावना दुखावणे), 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने जाणूनबुजून अपमान करणे) नुसार गुन्हा दाखल केला आहे. हाफिजगंज पोलीस स्टेशनमध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा 2008 च्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे.
इन्स्टाग्रामवर लिहीलं, बाबाचा मृत्यू जवळ येत आहे
हाफिजगंजच्या रिथोरा शहरातील खाटा मोहल्लाचा रहिवासी असलेल्या मुलाने सोशल मीडियावर पोस्ट केली. आरोपी अनस अन्सारी याने इन्स्टाग्रामवर लिहिलं की, "बाबाचा मृत्यू जवळ येत आहे." यावर हिंदू जागरण मंचच्या कार्यकर्त्याने तीव्र आक्षेप घेतला.
धमकी देणारा आरोपी अटकेत
याप्रकरणी हिंदू जागरण मंच आणि विश्व हिंदू परिषदेने पोलिसांकडे तक्रार केली आहे. यासोबतच या वादग्रस्त पोस्टचा स्क्रीनशॉट ट्विटरसह अन्य सोशल मीडिया साईट्सवर शेअर करण्यात आला आहे, त्यात बरेली पोलीस, आयजी, एडीजी आणि डीजीपी यांना टॅग करून आरोपीवर कारवाईची मागणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून होणार आरोपीची कसून चौकशी
हिंदू संघटनांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. त्यांनी त्वरित आरोपीला अटक केली असून आता त्याची अधिक चौकशी होणार आहे. आरोपी अनस अन्सारीचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध आहे का? आरोपी अनस अन्सारी कोणाच्या संपर्कात होता? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Assam Flood: आसाममधील काही भागांत पूरस्थिती कायम, 583 गावं अजूनही पाण्याखालीच; 1.22 लाख लोकांना फटका