एक्स्प्लोर
Advertisement
राहुल गांधीचे मोदींना पाच प्रश्न आणि पाच मागण्या
नवी दिल्ली: काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारच्या नोटाबंदीवर घणाघाती टीका करत, श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला 50 दिवस त्रास सहन करण्याचं आवाहन केलं होतं. ते 50 दिवस पूर्ण झालेले आहेत. आता लोकांना झालेल्या त्रासाची, मनस्तापाची नुकसान भरपाई सरकारने करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
काँग्रेसच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पत्रकात राहुल गांधींनी पाच प्रश्नांच्या उत्तरासाठी श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये
- नोटाबंदीनंतर देशवासियांनी मोठ्या प्रमाणात बँकात पैसे जमा केलेत, आता सरकारने किती काळा पैसा जमा झाला हे जाहीर करावं.
- नोटाबंदीमुळे देशाचं किती नुकसान झालं, किती कामागारांना आपला रोजगार बुडवावा लागला?
- नोटाबंदीनंतर बँका आणि एटीएमबाहेर लागलेल्या रांगेत किती जणांना आपला जीव गमवावा लागला? त्यापैकी किती जणांना नुकसान भरपाई मिळाली?
- नोटाबंदीचा निर्णय घेण्यापूर्वी काय तयारी करण्यात आली होती? नोटाबंदीचा निर्णय घेण्यापूर्वी कोणकोणत्या अर्थतज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली?
- नोटाबंदीपूर्वी 25 लाख रूपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेत जमा करणाऱ्या खातेदारांची यादी सरकार जाहीर करणार का?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement