एक्स्प्लोर
Delhi Violence | दंगेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश; दिल्ली पोलिसांकडून शांततेचं आवाहन
दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. 56 पोलिसांसह 130 नागरिक जखमी झाले आहे. रात्री आठ वाजता यमुना विहारमधील नूर-ए-इलाही चौकात पोलिसांनी इशारा दिला आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलनाची धग कायम आहे. आतापर्यंत हिंसाचारात पोलिस कॉन्स्टेबलसह 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर शूट अॅन्ड साईटचे आदेश पोलिसांनी दिले आहे. हिंसाचार घडवणाऱ्यांना दिसताचं क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहे. हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहे.
दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. 56 पोलिसांसह 130 नागरिक जखमी झाले आहे. रात्री आठ वाजता यमुना विहारमधील नूर-ए-इलाही चौकात पोलिसांनी इशारा दिला आहे. घरातून बाहेर पडू नका, अन्यथा गोळी घालण्यात येईल' असा इशारा पोलिसांकडून देण्यात आलेला आहे. सध्या यमुना विहार परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.
दिल्लीतील चार भागांत कर्फ्यू
मौजपुर, जाफराबाद, चांदबाग, करावल नगरमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत दिल्लीमध्ये 11 केसेस आल्या आहेत. तसेच काही नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, हिंसाचार घडलेल्या भागांमध्ये ड्रोनने नजर ठेवली जात आहे. आजही भजनपुरा, करावलन नगर, गोकुळपुरी, मौजपुर भागात दगडफेक घेण्यात आला आहे.
नॉर्थ ईस्ट परिसरातील शाळा बंद दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया नॉर्थ इस्ट परिसरातील शाळा बंद राहणार असल्याची माहिती ट्वीट करून दिली आहे. नॉर्थ ईस्ट भागातील शाळा उद्या बंद राहणार आहे. काही परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. सध्या अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, तसेच असे व्हॉट्सअॅप मेसेज देखील पाठवू नका, असे आवाहन केले आहे.Appeal for Peace pic.twitter.com/IgcUvRVyZv
— Delhi Police (@DelhiPolice) February 25, 2020
अफवांवर विश्वास ठेवू नका - दिल्ली पोलिस दिल्ली पोलिसांनी पीआरओ एमएस रंधावा यांनी पत्रकार परिषदेत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. रंधावा म्हणाले, अफवांवर विश्वास ठेवू नका तसेच कायदा हातात घेऊ नका. हिंसाचार झालेल्या भागांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करणाऱ्यांविरोधात कारवाई करणात येणार आहे. नियंत्रण कक्षात सिनीयर ऑफिसर्स तैनात करण्यात आले आहे. सीआरपीएफ, आरएएफच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. Majha Vishesh | दिल्ली कुणी पेटवली? दिल्ली पोलीस इतके हतबल कसे? | ABP Majha संबंधित बातम्या : Delhi Violence | हिंसाचारात दहा जणांचा मृत्यू, 186 जखमी Majha Vishesh | दिल्ली पेटवण्याचं पाप कुणाचं?हिंसा प्रभावित नोर्थ-ईस्ट ज़िले में कल भी स्कूल बंद रहेंगे. गृह परीक्षाएँ स्थगित कर दी गई हैं. CBSE से भी कल की बोर्ड परीक्षा स्थगित करने का अनुरोध किया है. https://t.co/VY4t7zjWSo
— Manish Sisodia (@msisodia) February 25, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
