School Re-opening: दिल्लीतील शाळा, महाविद्यालये आजपासून सुरू होणार, नाईट कर्फ्यूच्या वेळेतही बदल
दिल्लीतही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे तिथेही निर्बंध शिथील केले आहेत. आजपासून दिल्लीत शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत.
School Re-opening : देशात कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. दरम्यान, दिल्लीतही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे तिथेही निर्बंध शिथील केले आहेत. आजपासून दिल्लीत शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. 9 वी ते 12 पर्यंतच्या शाळा आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर महाविद्यालये, जीम आणि स्पा देखील उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे डिसेंबरमध्ये शाळा बंद करण्यात आल्या होत्या.
लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या (DDMA) बैठकीनंतर शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला. यादरम्यान कोचिंग इन्स्टिट्यूट उघडण्याचेही मान्य करण्यात आले आहे. दिल्लीत रात्रीचा कर्फ्यू पूर्णपणे हटवण्यात आला नाही मात्र, वेळेत बदल करण्यात आला आहे. आजपासून दिल्लीत रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंतच नाईट कर्फ्यू असणार आहे. दिल्ली स्टेट पब्लिक स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष आरसी जैन म्हणाले, की आता शाळा पुन्हा सुरू होण्याची वेळ आली आहे. विद्यार्थी देखील शाळा सुरू होण्याची नाट बघत होते असे जैन म्हणाले.
दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) आजपासून शाळा तसेच उच्च शैक्षणिक संस्था आणि इयत्ता 9 वी ते 12 वी साठी कोचिंग सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच 14 फेब्रुवारीपासून नर्सरी ते आठवीपर्यंतचे वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, चारचाकी वाहनाचे चालक एकटे प्रवास करत असल्यास त्यांना मास्क घालण्यापासून सूट दिली जाईल. तसेच सर्व कार्यालये आता 100 टक्के उपस्थितीसह काम करू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या: