एक्स्प्लोर

Delhi Fort Blast: डॉ. उमर नबी सुसाइड बॉम्बर, बूट बॉम्बचा वापर करुन स्फोट, कारच्या टायरवर सापडले घातक रसायनाचे अंश

Delhi Blast: या तपासात अमोनियम नायट्रेट आणि टीएटीपीचे अंश सापडल्याची माहिती समोर आली आहे. उमरच्या कारमध्ये सापडलेल्या बुटावर तसेच गाडीच्या टायरवरही टीएटीपीचे अंश आढळून आले आहेत.

नवी दिल्ली: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटासंबंधी (Delhi Blast) तपासात महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. स्फोटात (Delhi Blast) मारला गेलेला डॉ. उमर नबी हा सुसाइड बॉम्बरच होता. त्यासाठी त्याने 'बूट बॉम्ब'चा वापर केला असून त्यासाठी टीएटीपी हे रसायन वापरल्याचा निष्कर्ष एनआयएने काढला आहे. या तपासात अमोनियम नायट्रेट आणि टीएटीपीचे अंश सापडल्याची माहिती समोर आली आहे. उमरच्या कारमध्ये सापडलेल्या बुटावर तसेच गाडीच्या टायरवरही टीएटीपीचे अंश आढळून आले आहेत.(Delhi Blast) 

अमोनियम नायट्रेट आणि टीएटीपी (ट्रायॲसिटोन ट्रायपरॉक्साईड) ही अत्यंत संवेदनशील अशी स्फोटक रसायने मानली जातात. टीएटीपी हे रसायन अगदी सहज रगडले गेले तरी त्याचा स्फोट होतो. ही रसायने 'मदर ऑफ सॅटन' म्हणून दहशतवाद्यांच्या ठिकाणी ओळखले जातात.

कारमध्ये एक बूट आढळून आला असून टीएटीपीचा बुटाखाली वापर करून हा स्फोट घडवण्यात आला असल्याचे तपासातून स्पष्ट होत असल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात जखमी झालेल्या आणखी दोन व्यक्तींचा एलएनजेपी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या १५ झाली आहे.

Delhi Blast: एका आरोपीस दहा दिवसांची एनआयए कोठडी

लाल किल्ला परिसरातील स्फोट प्रकरणातील एक आरोपी आमीर रशीद अली यास न्यायालयाने दहा दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. जम्मू-काश्मीरचा रहिवासी असलेला अली याच्यावर डॉ. उमर नबी याच्यासोबत दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. दिल्लीत त्याला अटक झाली होती.

Delhi Blast: अधिकाऱ्याचा भाऊ अटकेत

स्फोटानंतर प्रकाशझोतात आलेल्या फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या भावाला गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी मध्य प्रदेशात अटक करण्यात आली आहे. हमूद अहमद सिद्दिकी यास हैदराबादेतून पकडण्यात आले. त्याच्यावर १० हजारांचे बक्षीस होते. त्याच्यावर १९८८ आणि १९८९ मध्ये हत्येचा प्रयत्न केल्या गुन्हाही नोंद आहे.

Who is Doctor Umar: डॉ. मोहम्मद उमर कोण आहे?

उमर हा हरियाणातील फरीदाबाद येथील अल फला मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होता. तपास यंत्रणांना संशय आहे की, तो फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी जोडला गेला आहे. उमर हा अनंतनाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी डॉक्टर आदिल अहमद राथेरचा जवळचा मित्र असल्याचे सांगितले जाते. ज्याला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. आदिलच्या चौकशीनंतर सोमवारी फरीदाबादमध्ये छापा टाकण्यात आला आणि उमरचे नाव समोर आले. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी उमरची आई शहेमा बानो आणि भाऊ आशिक आणि झहूर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सूत्रांचा दावा आहे की, उमरने त्याच्या दोन साथीदारांसह कट रचला आणि फरीदाबादमध्ये अटक झाल्यानंतर घाबरून तो अंमलात आणला.

महत्त्वाच्या बातम्या

Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Embed widget