एक्स्प्लोर
Advertisement
दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक
पुढची बैठक सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेत पार पडणार आहे.
नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधात देशभरातले विरोधी पक्ष एकवटत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत झालेल्या संविधान रॅलीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीतील निवासस्थानी विरोधकांसोबत बैठक घेतली.
दिल्लीत पवारांच्या घरी असलेल्या बैठकीला विरोधी पक्षातील विविध ज्येष्ठ नेत्यांनी सहभाग नोंदवला. अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. पुढची बैठक सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेत पार पडणार आहे.
पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, जनता दलाचे शरद यादव, माकप नेते टी. के. रंगराजन, डी. राजा, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, माजिद मेमन, डी.पी. त्रिपाठी, तारीक अन्वर उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनी सर्व विरोधकांनी सरकार विरोधात संविधान बचाव रॅली काढली होती. त्यानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी पुढची बैठक दिल्लीत घेण्याचं ठरलं होतं. या रॅलीत शरद पवार, शरद यादव, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, तुषार गांधी, राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेत्यांनी सहभाग घेतला होता.
मंत्रालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरु झालेली रॅली गेट वे ऑफ इंडियावर संपली. महत्वाचं म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही या रॅलीमध्ये सामील होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रत्नागिरी
बॉलीवूड
भारत
Advertisement