SpiceJet Delhi News : दिल्ली विमानतळावर दुर्घटना, स्पाईसजेटचे प्रवासीविमान उड्डाणापूर्वी विजेच्या खांबाला धडकले
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज (सोमवारी )सकाळच्या सुमारास स्पाईसजेटचे विमान प्रवाशांना घेऊन उड्डाण करण्यापूर्वी विजेच्या खांबाला धडकल्याची घटना घडली.
Delhi Airport : आज (सोमवारी) सकाळच्या सुमारास इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानतळावर (Indira Gandhi International Airport) एक मोठा अनर्थ होता-होता टळला. सकाळच्या सुमारास दिल्लीहून (Delhi Airport) श्रीनगरला (Delhi to Srinagar) जाणारे स्पाईस जेट कंपनीचे प्रवासीविमान उड्डाण घेण्यापूर्वी विजेच्या खांबाला धडकले. विमानाचा एक पंख विमानतळावरील एक भव्य अशा विजेच्या खांबाला धडकला. पण सुदैवाने या घटनेत कोणताच प्रवासी जखमी झाला नसून प्रवाशांना त्वरीत दुसऱ्या विमानात बसवण्यात आले.
स्पाइसजेटच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पाइसजेटच विमान एसजी 160 दिल्लीहून जम्मूच्या दिशेने जाणार होतं. पण उड्डाणापूर्वी पुश बॅक दरम्यान विमानाचा उजवा पंख तेथील एका विजेच्या खांबाला धडकला. ज्यामुळे विमानाच्या पंखाचं नुकसान झालं. ज्यामुले लगेचच संबधित विमानाजागी दुसरं विमान मागवण्यात आलं आणि त्यातून प्रवाशांना पाठवण्यात आलं. तळ अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेचा तपास सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान या संपूर्ण घटनेचा तपास सुरु असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबधित विमान हे दिल्लीहून 9 वाजून 20 मिनिटांनी निघणार होते. पण उड्डाण घेत असतानाच विमानाच्या उजव्या पंखाला मोठ्या प्रमाणात इजा झाली. या घटनेनंतर विमान उड्डाणासाठी योग्य राहिलं नव्हतं. पण सुदैवाने या संपूर्ण घटनेत मोठं नुकसान झालं नसल्याने प्रवाशांना दुखापत झाली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Solar Storm : नासाकडून पृथ्वीवासियांना सौरवादळाचा इशारा, नेमकं काय आहे सौरवादळ?
- Russia Ukraine War : युद्धादरम्यान जर्मनीकडून युक्रेनच्या पाठीशी, 100 मशीन गन आणि 1,500 क्षेपणास्त्रे युक्रेनमध्ये दाखल
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटावर राज्यपालांची अप्रत्यक्षरित्या प्रतिक्रिया, म्हणाले...