एक्स्प्लोर

Delhi Pollution : पुढील आदेशापर्यंत Delhi-NCRमध्ये शाळा-कॉलेज बंद, तर 21 नोव्हेंबरपर्यंत ट्रकला ‘नो एन्ट्री’

देशाची राजधानी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्याची वेळ येतेय की काय अशी स्थिती निर्माण झालीय.

Delhi-NCR School: देशाच्या राजधानीत सतत वाढत असलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या समितीने दिल्ली-एनसीआरमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच पुढील आदेश येईपर्यंत ऑनलाइन वर्ग सुरू राहणार आहे.

दरम्यान, प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने पुढील आदेश येईपर्यंत सर्व खासगी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

देशाची राजधानी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्याची वेळ येतेय की काय अशी स्थिती निर्माण झालीय. अखेर सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) या सगळ्यावर केंद्र आणि राज्याचे कान उपटल्यानंतर सरकार जागे झाले आहे.

50 टक्के लोकांना वर्क फ्रॉम होमची परवानगी द्यावी

मंगळवारी रात्री हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने वायू प्रदूषणाला तोंड देण्यासाठी अनेक सूचना दिल्या. तसेच, आयोगाने म्हटले आहे, की 50 टक्के सरकारी अधिकाऱ्यांना 21 नोव्हेंबरपर्यंत घरून काम करण्याची परवानगी द्यावी. याशिवाय खासगी कार्यालयांनाही त्याचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

21 नोव्हेंबरपर्यंत ट्रकला नो एन्ट्री

हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाकडून 21 नोव्हेंबरपर्यंत दिल्लीत ट्रकच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक वस्तूंच्या प्रवेशावर कोणतेही बंधन असणार नाही. याशिवाय रेल्वे, मेट्रो, विमानतळ आणि राष्ट्रीय सुरक्षा/संरक्षण वगळता सर्व बांधकामांवर 21 नोव्हेंबरपर्यंत बंदी असेल.

एक्यूआय (Air Quality Index) कसं मोजतात?

दरम्यान, 0 आणि 50 मध्ये एक्यूआयला 'उत्तम', 51 आणि 100 मध्ये 'संतोषजनक', 101 आणि 200मध्ये 'मध्यम', 201 आणि 300 मध्ये 'खराब', 301 आणि 400 मध्ये 'अत्यंत खराब' आणि 401 आणि 500 मध्ये 'गंभीर' समजलं जातं.

दरम्यान दिल्लीत प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्याची चर्चा सुरू होती. मात्र सर्व विभागासोबत चर्चा झाल्यानंतरच या पर्यायाचा विचार होईल असं अरविंद केजरीवाला यांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीत ऑक्टोबर महिन्यापासून हवेची प्रदूषण पातळी वाढायला लागली आहे. आसपासच्या राज्यांमध्ये शेत जाळण्याच्या प्रकारातून हे प्रदूषण होत असल्याचं समोर आलंय. सध्य प्रदूषणामुळे दिल्लीत आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Narendra Modi : एक वर्ष सोन्याची खरेदी का नको? काय आहे पंतप्रधान मोदी यांचे 72 अब्ज डॉलरच्या फॉरेक्समागचे लॉजिक?
एक वर्ष सोन्याची खरेदी का नको? काय आहे पंतप्रधान मोदी यांचे 72 अब्ज डॉलरच्या फॉरेक्समागचे लॉजिक?
Rajnath Singh : पश्चिम आशियातील तणावावर केंद्र सरकार सतर्क; राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दीड तास बैठक, इंधन-खत पुरवठ्याचा आढावा
पश्चिम आशियातील तणावावर केंद्र सरकार सतर्क; राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दीड तास बैठक, इंधन-खत पुरवठ्याचा आढावा
Cheapest Gold Price: भारतातील 'या' राज्यांमध्ये मिळतं सर्वात स्वस्त सोनं, काय आहेत कारणं? सोन्याचे दर वेगवेगळे का असतात? जाणून घ्या सविस्तर
भारतातील 'या' राज्यांमध्ये मिळतं सर्वात स्वस्त सोनं, काय आहेत कारणं? सोन्याचे दर वेगवेगळे का असतात? जाणून घ्या सविस्तर

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? 
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? 
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
Nandurbar Fire News: नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग, तब्बल 15 किमी अंतरावरून दिसतायेत धुराचे लोट
नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग, तब्बल 15 किमी अंतरावरून दिसतायेत धुराचे लोट
Mumbai Crime News: पत्नीच्या नावाचे आधार कार्ड घेऊन दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम; तपासानंतर सगळे हादरले, मुंबईतील खळबळजनक घटना
पत्नीच्या नावाचे आधार कार्ड घेऊन दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम; तपासानंतर सगळे हादरले, मुंबईतील खळबळजनक घटना
सुनेत्रा पवार म्हणाल्या आदिती माझी मुलगी; सुनिल तटकरेंकडूनही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक, महाराष्ट्राच्या पहिल्या वहिनी
सुनेत्रा पवार म्हणाल्या आदिती माझी मुलगी; सुनिल तटकरेंकडूनही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक, महाराष्ट्राच्या पहिल्या वहिनी
Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
Embed widget