Corona Update : दिल्लीत रविवारी 613 कोरोना रूग्णांची नोंद, तीन बाधितांचा मृत्यू
Corona Update : देशाची राजधानी दिल्लीत देखील कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी दिल्लीत कोरोनाचे 613 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
Corona Update : दोन महिन्यानंतर कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मार्च महिन्यात कोरोनापासून थोडाफार दिलासा मिळाला असताना एप्रिल अखेरनंतर देशात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. देशाची राजधानी दिल्लीत देखील कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी दिल्लीत कोरोनाचे 613 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत गेल्या 24 तासांत 784 लोक बरे झाले आहेत. दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या 3,762 आहे. दिल्लीतील कोनाचा संसर्ग दर 2.74 टक्क्यांवर गेला आहे.
दिल्लीच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 40921 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. शनिवारच्या तुलनेत आज कोरोना रूग्णांमध्ये घट झाली आहे. शनिवारी दिल्लीत कोरोनाचे 673 नवीन रुग्ण आढळले होते, तर चार जणांचा मृत्यू झाला होता. दिल्लीत 7 मार्च रोजी तीन आणि 4 मार्च रोजी चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काल 4 आणि आज तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन दिल्ली सरकारने केले आहे.
Delhi logs 613 new Covid cases, 3 deaths in a day; positivity rate 2.74 per cent: Health Bulletin
— Press Trust of India (@PTI_News) May 15, 2022
दिल्लीत कोरोना रूग्णांच्या संख्येत सतत चढ-उतार होत आहेत. दिल्लीत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3762 वर पोहोचली आहे. तर 137 रुग्ण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत कोरोना संसर्गाचा आलेख सातत्याने घसरत आहे. पण तरीही कोविडमुळे होणारे मृत्यू भयावह आहेत.
देशभरात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2487 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर शनिवारी 2858 रूग्णांची नोंद झाली होती. शनिवारच्या तुलनेत रविवारी 371 कमी रूग्णांची नोंद झाली आहे.