दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये मल्याळम भाषेच्या वापरावर बंदीचा निर्णय मागे, दिल्ली सरकारची हॉस्पिटल प्रशासनाला नोटीस
हॉस्पिटल प्रशासनाने एका आदेशाद्वारे कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये काम करताना मल्याळम भाषा वापरण्यावर बंदी आणली होती. यावर हॉस्पिटलच्या प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस जारी केली असल्याचं दिल्लीचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतील गोविंद वल्लभ पंत इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्यूएट मेडिकल एज्युकेशन अॅन्ड रिसर्चकडून नर्सिंग कर्मचाऱ्यांना मल्याळम भाषा वापरु नये असा जारी करण्यात आलेला निर्णय मागे घेतला आहे. प्रशासनाने एका आदेशाद्वारे कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये काम करताना मल्याळम भाषा वापरण्यावर बंदी आणली होती. यावर हॉस्पिटलच्या प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस जारी केली असल्याचं दिल्लीचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
हॉस्पिटल प्रशासना्च्या या निर्णयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, "इतर भारतीय भाषांप्रमाणे मल्याळम भाषाही भारतीय आहे, त्यामुळे भाषेच्य़ा आधारे करण्यात येणारा भेदभाव बंद करा."
Malayalam is as Indian as any other Indian language.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 6, 2021
Stop language discrimination! pic.twitter.com/SSBQiQyfFi
गोविंद वल्लभ पंत हॉस्पिटलने शनिवारी एक सर्क्युलर जारी केलं होतं. त्यामुध्ये आपल्या नर्सिंग काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कामाच्या वेळी मल्याळम भाषेत बोलू नये असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना असुविधा होत असल्याचं कारण सांगितलं होतं. जर त्यांना एकमेकांशी बोलायचं असेल तर त्यांनी केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेत बोलावं असंही यामध्ये सांगण्यात आलं होतं.
Govind Ballabh Pant Institute of Post Graduate Medical Education & Research, Delhi directs all its nursing personnel to use only Hindi&English for communication, warns of serious action if not done. It had received complaint against the use of Malayalam language in the institute pic.twitter.com/jQqCpqjOrn
— ANI (@ANI) June 5, 2021
दरम्यान, मल्याळम भाषेच्या बंदीवरील या निर्णयाचे सर्क्युलेशन प्रशासनाच्या मान्यतेशिवाय कोणीतरी जारी केलं असल्याचं हॉस्पिटल प्रशासनाचं मत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Maratha Reservation : मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, 16 जूनपासून आंदोलनाला सुरुवात; संभाजीराजेंचा इशारा
- Coronavirus : तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी राज्य सरकारची सर्व तयारी पूर्ण; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा विश्वास
- Dilip Kumar : प्रकृती अस्वास्थामुळे बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल