(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dilip Kumar : प्रकृती अस्वास्थामुळे बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल
प्रकृती अस्वास्थामुळे बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल केलं आहे, अशी माहिती सायरा बानो यांनी दिली आहे.
मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांनी प्रकृती अस्वास्थामुळे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत एबीपी न्यूजला माहिती दिली. त्या म्हणाल्या की, "दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यामुळेच त्यांना आज सकाळी साडेआठ वाजता मुंबईतील खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे नॉन कोविड रुग्णालय आहे. डॉ. नितिन गोखले यांच्या देखरेखीखाली दिलीप कुमार यांच्या सगळ्या चाचण्या करण्यात येत असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तुम्ही सर्वजण त्यांच्यासाठी प्रार्थना करा की, ते लवकर ठिक होवोत."
पाहा व्हिडीओ : Dilip Kumar : श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल
डिसेंबर 2020 पासूनच दिलीप कुमार यांची नाजूक आहे. अशातच सायरा बानो यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना आज सकाळी रुग्णालयातच दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांची प्रकृती नाजूक आहे, तसेच त्यांची रोगप्रतिकार शक्तीही कमी आहे. यापूर्वीही दिलीप कुमार यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी सायरा बानो यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यास चाहत्यांना सांगितलं होतं.
याच मुलाखतीत बोलताना सायरा बानो यांनी त्यांच्या आणि दिलीप कुमार यांच्या नात्याबाबत खुलासा केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, ज्यावेळी त्या 12 वर्षांच्या होत्या त्यावेळी बॉलिवूड लेजेंड दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्यावर त्यांचा जीव जडला होता. त्यानंतर त्यांनी शेवटी दिलीप कुमार यांच्याशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सायरा बानो यांनी बोलताना दिलीप कुमार आणि त्यांच्या पहिल्या भेटीबाबतही सांगितलं होतं. मुंबईतील महबूब स्टुडियोमध्ये त्या दिलीप कुमार यांना पहिल्यांदा भेल्या होत्या आणि पहिल्या भेटीतच त्या दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या.