Delhi Excise Policy : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची आज CBI चौकशी; केजरीवाल म्हणतात, ही तर अटकेची तयारी
Manish Sisodia News: मनिष सिसोदिया यांच्या घराजवळ कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमण्याची शक्यता आहे. यामुळे घराजवळील परिसरात कलम 144 लागू करण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे.
Delhi Politics: दिल्लीतील मद्य घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. अबकारी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. सीबीआयने आज सकाळी 11 वाजता मनीष सिसोदिया यांना चौकशीसाठी बोलावलंय. मनिष सिसोदिया यांच्या घराजवळ कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमण्याची शक्यता आहे. यामुळे घराजवळील परिसरात कलम 144 लागू करण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचे नेते देखील सिसोदिया यांच्या घरी आले आहत. आम आदमी पक्षाचे नेते सिसोदिया यांच्यासोतर सीबीआय कार्यलयापर्यंत जाणार आहेत. मनिष सिसोदिया यांच्या घरी मंत्री गोपाल राय, सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि कुलदिप कुमार आहेत. सिसोदिया यांनी त्यांना अटक करण्याची तयारी सुरू असल्याचा दावा केला आहे. सिसोदिया यांनी ट्विट करत हा दावा केला आहे.
मनिष सिसोदिया आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, माझ्या विरोधात कटकारस्थान रचण्यात आले आहे. खोटी केस दाखल करत मला अटक करण्याची तयारी सुरू केली आहे. मी काही दिवसात प्रचारासाठी गुजरातला जाणार होतो. मला गुजरातला जाण्यापासून रोखण्यासाठी हा कट रचला आहे. परंतु मला अटक केल्याने गुजरातचा प्रचार थांबणार नाही. गुजराती मतदार जागा झाला आहे. चांगल्या शाळा, रुग्णालये, नोकरी, वीज या सोयींसाठी गुजरातमधील लहान मुले देखील प्रचार करत आहेत. गुजरातची निवडणूर यावेळी एक आंदोलन असणार आहे. माझ्या घरी छापे टाकले, बँक लॉकर पाहिले, माझ्या गावी गेले परंतु त्यांना काहीच मिळाले नाही.
लेकिन मेरे जेल जाने से गुजरात का चुनाव प्रचार रुकेगा नहीं। आज हर गुजराती खड़ा हो गया है। अच्छे स्कूल, अस्पताल, नौकरी, बिजली के लिए गुजरात का बच्चा बच्चा अब चुनाव प्रचार कर रहा है। गुजरात का आने वाला चुनाव एक आंदोलन होगा।
— Manish Sisodia (@msisodia) October 17, 2022
तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाल, मनिष सिसोदिया यांच्या घरी छापे टाकण्यात आले. परंतु त्यांच्या घरी, बँक लॉकरमध्ये काही मिळाले नाही. गुजरात प्रचाराला जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांना अटक करत आहे. परंतु गुजरातचा प्रचार थांबणार नाही. कारण गुजरातचा प्रत्येक व्यक्ती 'AAP'चा प्रचार करत आहे.
मनीष के घर रेड में कुछ नहीं मिला, बैंक लॉकर में कुछ नहीं मिला। उन पर केस बिलकुल फ़र्ज़ी है
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) October 17, 2022
उन्हें चुनाव प्रचार के लिए गुजरात जाना था। उसे रोकने के लिए उन्हें गिरफ़्तार कर रहे हैं
पर चुनाव प्रचार रुकेगा नहीं। गुजरात का हर व्यक्ति आज “आप” का प्रचार कर रहा है।
तर आम आदमी पक्षाचे प्रवक्ता सौरभ भारद्वाज म्हणाले, मनिष सिसोदिया हे आजच्या युगातील सरदार भगतसिंह आहेत. आज प्रत्येक कार्यकर्त्यासाठी बलिदान दिन आहे. अबकारी घोटाळा हा नावाला असून खरे कारण गुजरात निवडणूक आहे. आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मनिष सिसोदिया यांचा अभिमान आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांना सीबीआय कार्यालयात सोडण्यास जाणार आहे.