एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
5 हजार डॉलर दे, अन्यथा व्हिडीओ व्हायरल करेन; तरुणीची धमकी
तरुणीच्या ब्लॅकमेलिंगच्या भीतीने बिझनेसमनने दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्याने व्हिडीओ चॅटसंबंधित सर्व दस्तऐवजही सायबर सेलला सादर केले आहेत.
नवी दिल्ली : एका मोठ्या बिझनेसमनकडून ऑनलाईन डेटिंग साईटद्वारे ब्लॅकमेल करुन लाखो रुपये मागितल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हा बिझनेसमन दिल्लीच्या उच्चभ्रू परिसरात राहतो.
एका तरुणीने स्काईपवर चॅटिंगदरम्यान बिझनेसमनचा आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीने पाच हजार डॉलर म्हणजेच सुमारे 3.5 लाख रुपयांची मागणी केली आहे.
तरुणीच्या ब्लॅकमेलिंगच्या भीतीने बिझनेसमनने दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्याने व्हिडीओ चॅटसंबंधित सर्व दस्तऐवजही सायबर सेलला सादर केले आहेत.
हे प्रकरण ऑक्टोबर महिन्यातलं आहे. दिल्ली पोलिसांनी 1 नोव्हेंबर रोजी बिझनेसमनला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु केली आहे.
पाच हजार डॉलर दिले नाही तर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी तरुणीने बिझनेसमनला दिली आहे.
तसंच हा व्हिडीओ मित्रांसह नातेवाईकांनाही पाठवण्याची धमकी दिली आहे. ही धमकी ऐकून बिझनेसमनला धक्का बसला. त्याने विनवणी केल्यानंतर तिने रक्कम अर्धी केली.
आरोपी तरुणीने आपलं नाव अॅमिलिया सांगितल्याचं तक्रारदार बिझनेसमनने पोलिसांना सांगितलं. तिच्यापासून दूर पळण्यासाठी त्याने गूगल हँगआऊट आणि स्काईपसह इतर सोशल साईटवरुन स्वत:ला डिसकनेक्ट केलं.
आरोपी तरुणी भारतात राहत नसून ती पॅरिसमध्ये राहते, असं चौकशीत समोर आलं आहे. तरुणीने कट रचून आपल्याला फसवल्याचं बिझनेसमनच्या लक्षात आलं. पैशांची मागणी करणारा पुरुष असू शकतो, असा संशय बिझनेसमनने व्यक्त केला आहे. ब्लॅकमेलिंगची धमकी दिल्यानंतर ती तरुणी कधीही समोर आली नाही, असंही त्याने सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement