एक्स्प्लोर

अखेर दिल्ली विधानसभा मतदानाची टक्केवारी जाहीर, विलंब झाल्याने 'आप'कडून आक्षेप 

दिल्लीच्या जनतेनं कुणाच्या पारड्यात सत्ता टाकली याचा अंतिम निकाल 11 फेब्रुवारीला समोर येणार आहे. मात्र त्याआधी आलेल्या सर्व वाहिन्यांच्या पोल ऑफ पोलनुसार केजरीवाल यांची आप पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज वर्तवला जात आहे. 

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर जवळपास २० तासाच्या नंतर अखेर मतदानाची अंतिम टक्केवारी दिल्ली निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर न केल्यामुळे आपकडून आक्षेप घेतले होते. मतदान झाल्यानंतरही मतदानाची निश्चित टक्केवारी घोषित करण्यात आली नव्हती. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. अखेर दिल्ली आयोगाने पत्रकार परिषद घेत दिल्ली विधानसभेसाठी 62.59टक्के मतदान झाल्याची घोषणा केली. आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काल उशिरापर्यंत मतदान सुरु होते. रात्री उशिरापर्यंत ईव्हीएम मशीन येत होत्या. पोलिंग स्टेशनवरून आलेला डेटा सिस्टममध्ये टाकला जात होता. त्यामुळे विलंब झाला. या निवडणुकीत 62.59 टक्के मतदान झाले आहे. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत 67.47 टक्के मतदान झाले होते. म्हणजे यावेळी गेल्यावेळच्या तुलनेत पाच टक्के मतदान कमी झाले आहे.  केजरीवालांनी घेतला आक्षेप   आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी इतका वेळ होऊन देखील मतदानाची टक्केवारी जाहीर न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करत काही प्रश्न उपस्थित केले होते.  हे शॉकिंग आहे, निवडणूक आयोग काय करत आहे? मतदान होऊन इतका वेळ झाला तरी टक्केवारी का सांगितली जात नाही? असे प्रश्न त्यांनी ट्विट करत उपस्थित केले.  तर आपचे संजय सिंह यांनी म्हटलं आहे की,  दिल्ली निवडणुकीत किती टक्के मतदान झालंय, याबाबत देशातील लोकांना माहिती हवीय.  निवडणूक आयोग वोटिंगची टक्केवारी सांगायला एवढा वेळ का घेत आहे? लोकसभा निवडणुकीच्या वेळी तर एका तासाच्या आत मतदानाची टक्केवारी सांगितली जाते, मग दिल्ली सारख्या छोट्या राज्यात एवढा विलंब का? , असं संजय सिंग यांनी म्हटलं आहे. भाजपची आपवर टीका  आपकडून आक्षेप घेतल्यानंतर भाजपकडून मात्र आपवर टीका केली आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी आपवाले उगाच परेशान होत असल्याचे म्हटलं आहे. एक्झिट पोलमध्ये आपला ४४ जागा मिळत असल्याचे सांगितलं जात आहे मात्र तरीही त्यांची धाकधूक होत आहे. आतापासूनच हे लोक एव्हीएमला दोष देण्याची योजना बनवता आहेत, आप हताश झाली आहे, असे तिवारी यांनी म्हटलं आहे. पुन्हा केजरीवालच सत्तेत, एक्झिट पोलचा अंदाज एबीपीन्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार दिल्लीतील एकूण  70 विधानसभा जागांपैकी आम आदमी पार्टी (AAP) ला  51 ते 65 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. भाजपच्या खात्यात  3 ते 17 जागा तर काँग्रेसला 0 ते 3 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. सर्व्हेनुसार सरासरी आपला  58, भाजपला  10 आणि काँग्रेसला दोन जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. काय आहे पोल ऑफ पोलचा अंदाज  सर्व्हे एजन्सी / वाहिनी                    AAP            BJP        Congress एबीपी-सी व्होटर                           51-65          3-17       0-3 आज तक- एक्सिस माय इंडिया     59-68          2-11      0 रिपब्लिक- जन की बात                 48-61          9-21    0-1 टाइम्स नाऊ-आयपीएसओएस         47              23          0 टीव्ही -9 आणि सिसरो                     54            15            1 इंडिया न्यूज-नेता                         53-57         11-17           0-2 पोल ऑफ एग्जिट पोल्स सरासरी    56               13              1 काय आहे एबीपी न्यूज सी व्होटरचा सर्व्हे एबीपी न्यूज सी व्होटरच्या अंदाजानुसार दिल्लीमध्ये 2020 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 70 जागांपैकी आम आदमी पक्षाला 51 ते 65 जागा मिळण्याचा अंदाज आहे. या आकड्यानुसार पुन्हा एकदा केजरीवाल यांची एकहाती सत्ता दिल्लीत येण्याची चिन्हे आहेत. भाजपला यावेळी 5 ते 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 0 ते चार जागा मिळण्याचा अंदाज आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे अरविंद केजरीवाल यांना शह देण्यासाठी भाजपने उभे केलेल्या मनोज तिवारी यांची जागा देखील धोक्यात असल्याचे या सर्व्हेत सांगण्यात आले आहे. Delhi Opinion Poll | दिल्लीकरांचा विश्वास केजरीवालांवरच, पुन्हा सत्ता 'आप'च्या हाती, सर्वेचा अंदाज कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार  आम आदमी पक्ष -  51 ते 65 जागा भाजप - 3 ते 17 जागा काँग्रेस -0 ते 3 जागा कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान  आप - 50.4 भाजप - 36 काँग्रेस - 9 इतर - 2.6 Delhi Election 2020 Opinion Poll : मुख्यमंत्रीपदी पुन्हा केजरीवाल यांनाच पसंती 2015 च्या निवडणुकीत काय होती स्थिती  2015 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने 70 जागांपैकी 67 जागांवर दणदणीत विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला खातं देखील उघडता आलेलं नव्हतं.

महत्त्वाच्या बातम्या

Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
Rahul Gandhi: काँग्रेसचं सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन...जे खासदार आंदोलनात आले नाहीत त्यांची यादी तयार करा, राहुल गांधी यांची केसी वेणुगोपाल यांना सूचना
जे खासदार आंदोलनात आले नाहीत त्यांची यादी तयार करा, राहुल गांधी यांची केसी वेणुगोपाल यांना सूचना
GST Council Meeting : अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget