(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोना लसींच्या मंजूरीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, 'अभिनंदन भारत, हा निर्णायक टप्पा!'
DCGI कडून सीरमच्या covishield, भारत बायोटेकच्या Covaxin लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांचं अभिनंदन केलं आहे.
नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय नागरिकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून सीरमच्या covishield, भारत बायोटेकच्या Covaxin लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांचं अभिनंदन केलं आहे. आपल्या मेहनती शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो. डीसीजीआयनं कोरोनावरील सीरम आणि भारतबायोटेकच्या लसींना आपातकालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे. कोरोना विरोधातील उत्साही लढा मजबूत करण्यासाठी हा निर्णायक टप्पा असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. हो निर्णय निरोगी आणि कोविड-मुक्त देश होण्याच्या वाटचालीकडे वेगाने जात असल्याचं द्योतक आहे, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, या कोरोना काळात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, शास्त्रज्ञ, पोलिस कर्मचारी, स्वच्छता कामगार आणि सर्व कोरोना योद्ध्यांच्या कृतज्ञतेसाठी मी व्यक्त करतो. या योद्ध्यांनी अनेकांचे जीव वाचविल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत, असं मोदींनी म्हटलंय.
We reiterate our gratitude to doctors, medical staff, scientists, police personnel, sanitation workers and all Corona warriors for the outstanding work done, that too in adverse circumstances. We will remain eternally grateful to them for saving many lives.
— Narendra Modi (@narendramodi) January 3, 2021
पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत म्हटलं आहे की, आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आलेल्या दोन लसी भारतात तयार झाल्या आहेत, याचा प्रत्येकाला अभिमान आहे. आत्मानिर्भर भारतचे स्वप्न पूर्ण करण्याचं हे एक महत्वाचं पाऊल आहे, असं मोदींनी म्हटलंय.
A decisive turning point to strengthen a spirited fight! DCGI granting approval to vaccines of @SerumInstIndia and @BharatBiotech accelerates the road to a healthier and COVID-free nation. Congratulations India. Congratulations to our hardworking scientists and innovators.
— Narendra Modi (@narendramodi) January 3, 2021
शनिवारीच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना तज्ज्ञ समितीनं मान्यता दिली होती. ज्यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DCGI कडून आज परवानगी मिळाली आहे. सोबतच कॅडीलाच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल करायलाही परवानगी देण्यात आली आहे. कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापराबाबतच्या संमतीसाठी तज्ज्ञ समितीनं शिफारसही केली होती. कोवॅक्सिन ही भारत बायोटेकद्वारा विकसित केलेली देशी लस आहे. अशा प्रकारे तज्ज्ञ समितीने मंजूर केलेली ही दुसरी लस आहे. यापूर्वी, ऑक्सफोर्डच्या लसीला तज्ज्ञ समितीनं मान्यता दिली होती.
DCGI शी संलग्न अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार त्यांच्याकडून जेव्हा कोणत्याही औषधास मान्यता मिळते, तेव्हा त्या कंपनीला CT23 अर्थान परवानगी मिळते. ज्यानंतर औषधाची निर्मिती ज्या राज्यात केली जात आहे ते राज्य स्टेट ड्रग रेगुलेटरी अथॉरिटीकडे जाऊन ड्रग एंडोर्समेंटची मागणी करतं. ज्यानंतर हे औषध रोल आऊट होतं. या प्रक्रियेसाठी 4-5 दिवसांचा कालावधी लागू शकतो.
Corona Vaccine Dry Run: मुंबई पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी सज्ज, ड्राय रनचीही गरज नाही!
देशात लवकरच सुरु होणार कोरोना लसीकरण
सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी अर्थात तज्ज्ञ समितीच्या शिफारसीनंतर आता डीसीजीआयच्या या घोषणेनं मोठा दिलासा मिळाला आहे. आता या दोन्ही लसींच्या निर्धारित आपात्कालीन वापराला परवानगी मिळताच भारतात तातडीनं कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे.
अफवांना बळी पडू नका- केंद्रीय आरोग्यमंत्री
भारतात जगभरातील सर्वात मोठ्या लसीकरण प्रक्रियेला सुरुवात होत असतानाच अनेक अफवा पसरण्याचीही शक्यता आहे. पण, अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नका असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केलं आहे.