एक्स्प्लोर

कामगारांच्या देशव्यापी संपाचा दुसरा दिवस, अनेक सेवांवर परिणाम

सरकारच्या योजना कामगारविरोधी असल्याचा आरोप करत देशातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांनी एकजूट करुन दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे.

नवी दिल्ली : सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरोधात देशभरातल्या 25 कोटी कामगारांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. बँक, पोस्ट ऑफिस, अंगणवाडी सेविका, विमा कर्मचारी, रेल्वे कर्मचारी संपावर आहेत. सरकारच्या योजना कामगारविरोधी असल्याचा आरोप करत देशातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांनी एकजूट करुन दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. शेतमजुरांसहित सर्व कामगारांना किमान 18 हजार रुपये वेतन मिळावं, कामगार कायदे न पाळणाऱ्या मालकांवर कारवाई करावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. देशव्यापी संपाचा निर्णय देशातील 10 प्रमुख केंद्रीय कामगार संघटना आणि विविध उद्योगातील देशपातळीवरील स्वतंत्र संघटनांनी राजधानी दिल्लीतील संयुक्त परिषदेत घेतला. या परिषदेत INTUC, AITUC, CITU, HMS, AICCTU, IPF, SEWA, TUCI, AIUTUC, NTUI या संघटनांचा सहभाग आहे. कोणाकोणाचा समावेश? रेल्वे, बँक, विमा, पोर्ट ट्रस्ट, कोळसा उद्योग, तेल आणि वायू, स्टील, पब्लिक सेक्टर कारखाने, वाहतूक उद्योग, बेस्ट, एसटी, टॅक्सी-रिक्षा म्युनिसिपल कामगार, फेरीवाले, माथाडी कामगार आणि कॉंट्रॅक्ट आणि आऊटसोर्स्ड कामगार, अंगणवाडी महिला, आशा कामगार, शिक्षक, प्राध्यापक, ग्रामपंचायत कर्मचारी, ईएसआय नर्स, नगरपालिका कामगार, अशा व्यापक जनसमूहांच्या प्रतिनिधींनी संप पुकारला आहे. संपाच्या मागण्या काय? 1) शेतमजुरांसह सर्व कामगारांना 18 हजार रुपये किमान वेतन मिळालेच पाहिजे. 2) वाढती महागाई त्वरित रोखा आणि रेशन व्यवस्था बळकट करा. 3) रोजगार निर्मिती कॉंट्रॅक्ट सिस्टमने बंद करा आणि समान कामाला समान वेतन द्या, कॉंट्रॅक्टवरील कामगारांना कायम करा 4) बेरोजगारी रोखा, रोजगार वाढवा 5) कामगार कायदे न पाळणाऱ्या मालकांवर कारवाई करा. भांडवलदार आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या हुकूमानुसार कामगार कायदेबदल करणे थांबवा 6) सर्व कामगार शेतकरी जनतेला किमान तीन हजार रुपये पेन्शन मिळालेच पाहिजे 7) बोनस, पीएफ (भविष्य निर्वाह निधी), ग्रॅच्युईटी कायद्यावरील सीलींग रद्द करा आणि ग्रॅच्युईटी रक्कम वाढवा 8) पब्लिक सेक्टर कंपन्यांचे खाजगीकरण थांबवा,अर्थव्यवस्था कमकुवत करु नका 9) रेल्वे, संरक्षण, पोर्ट ट्रस्ट, बँक आणि विमा व्यवसायाचे खाजगीकरण आणि या क्षेत्रात परकीय थेट गुंतवणूक (FDI) बंद करा. 10) कामगार कायदा बदलातून कामगार हक्क हिरावणे बंद करा 11) रजिस्ट्रार ऑफ ट्रेड युनियनकडे युनियन नोंदणी 45 दिवसांत झालीच पाहिजे. ILO च्या 87 आणि 98 रेक्टिफिकेशनला मान्यता का देत नाहीत ? 12) सर्व नागरिकांना सामाजिक सुरक्षा मिळालीच पाहिजे. देशाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केवळ दीड टक्का तरतूद अपुरी आहेच. आपण तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहोत तर सामाजिक सुरक्षा अंतर्गत शिक्षण, आरोग्य, रेशन, पेन्शन यावर तरतूद 12 टक्के नको का?

महत्त्वाच्या बातम्या

महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget