एक्स्प्लोर

Dawood Ibrahim : हिंसक कारवायांसाठी दाऊद करतोय निकटवर्तीयांचा लोकांचा वापर, एनआयएच्या तपासातून माहिती उघड

Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा इतर कोणावर जास्त विश्वास नाही. त्यामुळे भारतात हिंसक कारवाया करण्यासाठी आपल्या निकटवर्तीय व्यक्तींचा वापर करत आहे.

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) भारतात हिंसक कारवाया करण्याच्या तयारीत आहे. देशातील अनेक दिग्गज व्यक्ती त्याच्या निशाण्यावर असून दाऊद टोळी रिअल इस्टेट आणि मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून फंडिंग करत आहे, अशी माहिती एनआयएला मिळाली आहे. हिंसक कारवाया करण्यासाठी दाऊद  निकटवर्तीय व्यक्तींचा वापर करत आहे,अशी माहिदी देखील आता समोर आली आहे. 

दाऊद याचा इतर कोणावर जास्त विश्वास नाही. त्यामुळे भारतात हिंसक कारवाया करण्यासाठी  निकटवर्तीय व्यक्तींचा वापर करत आहे. कोणतेही हिंसक काम करण्यासाठी किंवा महत्वाची डील करण्यासाठी कुटुंबातील  निकटवर्तीय व्यक्तीचाच वापर दाऊद करतो. एनआयएनं छोटा शकीलचा मेहुणा आरिफ अबुबकर शेख (Arif Abubakar shaikh)  उर्फ ​​आरिफ भाईजान आणि त्याचा भाऊ शब्बीर अबुबकर शेख (Shabbir Abubakar Shaikh)  या दोघांना अटक केली आहे. यातून ही माहिती समोर आली आहे. एनआयएनं या आधी छोटा शकील याचा साडू सलीम फ्रूट याला देखील अटक केली आहे. 

एनआयए सध्या दाऊद आणि त्याच्या  निकटवर्तीयांकडून होत असलेल्या टेरर फंडिंगबाबतची चौकशी करत आहे. या प्रकरणाचा तपास करत असतानाच एनआयएने चौकशीनंतर छोटा शकीलचा मेहुणा आरिफ अबुबकर शेख (Arif Abubakar shaikh)  उर्फ ​​आरिफ भाईजान आणि त्याचा भाऊ शब्बीर अबुबकर शेख (Shabbir Abubakar Shaikh)  या दोघांना अटक केली. मुंबईच्या पश्चिम उपनगर परिसरातील बेकायदेशीर कामात दाऊदच्या डी गॅंगचा सहभाग असून दहशतवाद पसरवण्यासाठी आर्थिक मदत करत होते, असा आरोप आरिफ आणि शब्बीर या दोघांवर आहे. यातील आरीफ हा या पूर्वी छोटा शकील याच्या व्यवसायांचा प्रमुख म्हणून काम पाहात होता.   

तपासात असे आढळून आले आहे की, एकदा दाऊदला खूप राग आला होता. त्यावेळी त्याचा राग शांत करण्यासाठी आरिफ याने मध्यस्थी केली होती. त्यासाठी आरिफ याला पाकिस्तामधून 50 लाख रूपये पाठवले होते. 

एनआयएच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये मुंबई क्राईम ब्रँचने दाऊद इब्राहिमचा भाचा रिझवान कासकर याला अटक केली होती. दाऊद इब्राहिमला याची माहिती मिळताच तो संतापला. त्यामुळे त्याने त्याच्या जवळच्या लोकांना खूप फटकारले. हे कसे होऊ शकते? कुटुंबातील नवीन पिढी पोलिसांनी कशी काय पकडली? असे प्रश्न उपस्थित करत दाऊद याने जवळच्या लोकांना फटकारले होते. त्यानंतर आरिफ याने दाऊदला त्याच्या नेटवर्कद्वारे सांगितले की त्याला दोन कोटी रुपये हवे आहेत, तो येथे सर्वकाही व्यवस्थापित करेल, शिवाय रिझवानची सुटका करेल, त्यानंतर त्याला पाकिस्तानमधून टोकन म्हणून 50 लाख रुपये पाठवले गेले. हे पैसे पाकिस्तानमधून गुजरात येथील सुरत आणि नंतर तेथून मुंबईत आरिफ याच्याकडे आले. परंतु, आरिफला रिझवान याला सोडवता आले नाही. तेथूनच आरिफ पोलिसांच्या रडारवर होता.  

त्यानंतर एनआयएने सलीम फ्रुट याला अटक केली. सलीम हा दोन वर्षांपूर्वी मलेशियाला गेला होता. तेथून तो पाकिस्तानला गेला होता. तेथे तो दाऊदच्या हस्तकांना भेटला होता. त्यावेळी त्याने भारतात टेरर फंडिंगसाठी पैसे कसे गोळा करायचे याबाबत नियोजन केले होते. त्यानंतर पोलिसांनी सलीम याला ताब्यात घेतले. सलीम फ्रूट हा पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी ही सर्व कामे आपल्या पत्नीच्या नावे करत होता असे देखील तपासात पुढे आले आहे. त्याच्या पत्नीच्या नावे मुंबईत दोन इमारती देखील आहेत. 

एनआयएने या वर्षाच्या सुरूवातीला दाऊद याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. भारतात हिंसक कारवाया करण्यासाठी दाऊदकडून नवीन मॉडेल तयार करण्यात आले असून त्यासाठी त्याने एक यूनिट देखील तयार केले आहे. या यूनिटच्या माध्यमातून दाऊद भारतातील व्यापाऱ्यांना लक्ष्य करण्याच्या तयारीत होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यासाठी तो दिल्ली आणि मुंबईत हिंसा पसरवण्याचे काम करत आहे. त्यामुळे एनआयएने कसून तपास केला आणि यात सहभागी असणाऱ्या संशयितांना अटक केली आहे. 
  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget