एक्स्प्लोर
200 रुपयांची नोट चलनात आणण्याची तारीख ठरली!
200 रुपयांची नोट चलनात आणण्याची तारीख ठरली आहे. मात्र, तारखेची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. महत्त्वाचं म्हणजे 200 रुपयांच्या नोटांसाठी एटीएम मशिनमध्ये कोणतेही बदल करण्याची गरज भासणार नाही.
नवी दिल्ली : 200 रुपयांची नोट चलनात आणण्याची तारीख ठरली आहे. मात्र, तारखेची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. महत्त्वाचं म्हणजे 200 रुपयांच्या नोटांसाठी एटीएम मशिनमध्ये कोणतेही बदल करण्याची गरज भासणार नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, 200 रुपयांच्या नोटांची छपाई मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आली आहे. ही नोट चलनात आणण्याची तारीखही ठरवण्यात आली आहे. चलनात आल्यानंतर 200 रुपयांच्या नोटांची कमी भासू नये, यादृष्टीने छपाईचे प्रयत्न सुरु आहेत.
सध्या चलनात असलेल्या नोटांएवढाच आकार 200 रुपयाच्या नोटांचा असेल, त्यामुळे एटीएम मशिनमध्ये काहीही बदल करण्याची गरज भासणार नाही. 500 आणि 2 हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या त्यावेळी एटीएम मशिनमध्ये बदल करावे लागले. कारण या नोटांच्या आकारात बदल होता.
सध्या (2017) चलनात किती रुपयांच्या नोटा किती टक्के?
- 100 रुपयांहून कमी किंमतीच्या नोटा – 7.3 टक्के
- 100 रुपये – 20.3 टक्के
- 500 रुपये – 43.6 टक्के
- 2000 रुपये – 28.8 टक्के
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
राजकारण
Advertisement