एक्स्प्लोर
हिंदू विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी 15000ची सशस्त्र सेना
नवी दिल्ली: डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींनी देशातील हिंदू विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी १५०००ची सेना कार्यरत असल्याची माहिती दिली आहे. सीबीआयकडून यासंदर्भात स्पष्ट करण्यात आले.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, दाभोळकर हत्येप्रकरणात अटकेत असलेला संशयित आरोपी सनातन संस्थेचा सदस्य विरेंद्र तावडे याने २००९मधील गोवा बॉम्बस्फोटातील अरोपी सारंग अक्कोलकर याला इमेल केला होता. या इमेलमध्ये काही संधिग्द शब्दांचा वापर करण्यात आला होता. सारंग अक्कोलकर याला यापूर्वीच इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस बजावली होती.
तावडेच्या मेलमध्ये १५००० जणांच्या सशस्त्र तुकडीचा उल्लेख होता. या तुकडीची स्थापना हिंदू विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या सेनेचा खर्च दानधर्मातून करावा. जर गरज पडल्यास यासाठी लुटदेखील करण्याचे सांगण्यात आले होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दाभोळकर हत्येसाठी तावडेने पाठवलेल्या मेलमध्ये बंदूकीसाठी पुस्तक आणि गोळ्यांसाठी चॉकलेट या परावलीच्या शब्दांचा वापर केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement