Note Exchange : नोट फाटकी असो किंवा अर्धी... तरीही मिळतील पैसे; कसे ते वाचा
Note Exchange Rules : जर तुमच्याकडे 5, 10, 20 किंवा 50 रुपयांसारख्या कमी किमतीची फाटकी नोट असेल तर, तुमच्याकडे किमान अर्धी नोट असणे गरजेचं आहे.
![Note Exchange : नोट फाटकी असो किंवा अर्धी... तरीही मिळतील पैसे; कसे ते वाचा currency note rules for exchange of mutilated old notes Note Exchange : नोट फाटकी असो किंवा अर्धी... तरीही मिळतील पैसे; कसे ते वाचा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/57d986b0d5d5de909de8eb1d56180f471672388809626322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Currency Note Exchange Rules : अनेक वेळा दुकानदार किंवा रिक्षाचालक किंवा इतर कुणीही आपल्याला फाटकी नोट दिल्याचं लक्षात येतं, पण ही गोष्ट आपल्या लक्षात येईपर्यंत बराच वेळ फार उशीर होतो. मग आपला त्या फाटक्या नोटेसोबतचा संघर्ष सुरु होतो कारण, अशी फाटकी नोट कुणीही घेण्यास तयार नसतो. दुकानदार असो किंवा रिक्षाचालक अर्धी सोडा पण नोट किंचित फाटकी जरी दिसली, तरी अशी नोट घेण्यास ते सरळ नकार देतात. अशा वेळी आपल्याला नोट बदलून मिळण्याची चिंता असते. पण तुमच्यासोबतही असं काही घडलं असेल आणि तुम्हाला फाटकी किंवा अर्धी नोट बदलायची असेल, तर ते शक्य आहे. फाटकी किंवा अर्धी नोट तुम्ही बँकेमध्ये जाऊन बदलून घेऊ शकता.
तुम्ही कोणत्याही बँकेच्या कोणत्याही ब्राँचमध्ये जाऊन तुमच्याकडे असलेली फाटकी किंवा अर्धी नोट बदलून घेऊ शकता. जर कोणतीही बँक तुम्हाला नोट बदलून देण्यास नकार देत असेल, तर तुम्ही त्या बँकेविरोधात तक्रार करु शकता. यानंतर संबंधित बँकेवर कारवाई केली जाईल. यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोट जितक्या वाईट स्थितीमध्ये असेल तिची मिळणारी किंमत तितकी कमी असेल.
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) फाटक्या किंवा अर्ध्या नोटा बदलण्यासाठी काही मार्गदर्शक सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.
तुम्ही कशा आणि कोणत्या नोटा बदलून घेऊ शकता, याबद्दल सविस्तर वाचा...
'हे' आहेत RBI चे नियम
तुमच्याकडे 5, 10, 20 किंवा 50 रुपयांच्या कमी किमतीची फाटलेली नोट असेल तर तुमच्याकडे अशा नोटेची किमान अर्धी नोट असणे आवश्यक आहे. जर तुमच्या 20 रुपयांची फाटलेली नोट असेल आणि त्यातील अर्धी नोट म्हणजे सुमारे 50 टक्के सुरक्षित आणि चांगल्या स्थितीत असेल तर, त्या बदल्यात तुम्हाला 20 रुपयांची नोट बदलून मिळेल.
जर फाटलेल्या नोटेची संख्या 20 रुपयांपेक्षा जास्त असेल तर, जास्त किमतीच्या नोटा बदलून घेण्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागेल. नोटा बदलण्याबाबतचा सोपा नियम असा आहे की, नोटेवर गांधीजींचा फोटो किंवा वॉटरमार्क, आरबीआय गव्हर्नरची स्वाक्षरी आणि अनुक्रमांक या खुणा सुरक्षित असतील, तर अशी नोट तुम्हाला बदलून मिळू शकते. बँका तुम्हाला अशा नोटा बदलून घेण्यास नकार देऊ शकत नाही.
'या' नोटा बदलून मिळणार नाहीत
आरबीआयच्या नियमानुसार, जर तुम्हाला बनावट नोट मिळाली असेल तर ती नोट नक्की बदलून मिळेल. जुन्या आणि फाटलेल्या नोटा सहज बदलता येतात. यासाठी तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. परंतु, जर तुमची नोट जळाली असेल किंवा त्याचे खूप तुकडे असतील तर ती नोट बदलली जाणार नाही. तुम्ही नोटा जाणूनबुजून कापल्या किंवा फाडल्या असे बँकेच्या अधिकाऱ्यांना वाटलं, तर अशा परिस्थितीतही तुम्हाला नोट बदलून मिळणार नाही.
फाटलेल्या नोटांसाठी किती पैसे परत मिळतील ?
फाटलेली नोट बदलण्यासाठी तुम्हाला किती पैसे परत मिळतील हे नोट किती फाटली आहे आणि ती कोणत्या परिस्थितीमध्ये आहे यावर अवलंबून आहे. समजा तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटेचा 88 स्क्वेअर सेंटीमीटर भाग असेल तर तुम्हाला त्या नोटेचे पूर्ण पैसे मिळतील. जर तुमच्याकडे 44 स्क्वेअर सेंटीमीटर नोटेचा भाग असेल तर तुम्हाला नोटेची अर्धी किंमत मिळे. तसेच, जर तुमच्याकडे 200 रुपयांची फाटक्या नोटेचा 78 स्क्वेअर सेंटीमीटर भाग सुरक्षित असेल तर पूर्ण तुम्हाला त्या नोटेचे पूर्ण पैसे मिळतील, पण जर तुमच्याकडे नोटेचा फक्त 39 स्क्वेअर सेंटीमीटर भाग असेल तर तुम्हाला निम्मेच पैसे मिळतील.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)