एक्स्प्लोर

Cowin Registeration : कोविड लसीकरणासाठी अवघ्या चार तासात जवळपास 80 लाख लोकांची नोंदणी!

बुधवारी अवघ्या तीन तासांमध्ये जवळपास 80 लाख लोकांनी या पोर्टलवर आपलं रजिस्ट्रेशन केलं असल्याची माहिती मिळाली आहे. नोंदणी प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कोविन पोर्टलवर अडचणी आल्या मात्र नंतर (http://cowin.gov.in), आरोग्य सेतु आणि उमंग अॅप वर रजिस्ट्रेशन व्यवस्थित सुरु झालं.

नवी दिल्ली : देशात 16 जानेवारीपासून जाहीर करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला 1 मे पासून सुरुवात होत आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. या लसीकरण मोहिमेची नोंदणी प्रक्रिया आज, 28 एप्रिलपासून सुरू झाली आहे. बुधवारी अवघ्या तीन तासांमध्ये जवळपास 80 लाख लोकांनी या पोर्टलवर आपलं रजिस्ट्रेशन केलं असल्याची माहिती मिळाली आहे. नोंदणी प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कोविन पोर्टलवर अडचणी आल्या मात्र नंतर (http://cowin.gov.in), आरोग्य सेतु आणि उमंग अॅप वर रजिस्ट्रेशन व्यवस्थित सुरु झालं. रात्री आठ वाजेपर्यंत एकूण 79 लाख 65 हजार 720 लोकांनी लसीसाठी नोंदणी केली आहे. 

नॅशनल हेल्थ अॅथॉरिटीचे सीईओ आणि कोविन एम्पावर्ड कमिटीचे चेअरपर्सन आर. एस. शर्मा यांनी सांगितलं की, आज कोविन वर 79,65,720 रजिस्ट्रेशन झालं. यापैकी अधिकांश रजिस्ट्रेशन सायंकाळी (4 वाजेपासून 7 वाजेपर्यंत ) झालं. ज्यांचं वय 18 ते 44 आहे अशांनी खूप जास्त प्रमाणात नोंदणी केली आहे. प्रति सेकंद 55 हजार लोकं पोर्टलवर होते, या दरम्यान सिस्टमनं अपेक्षेप्रमाणे काम केलं असल्याचं शर्मा यांनी सांगितलं.

नोंदणी करताना सुरुवातीला तांत्रिक अडचणी येत असल्याचं समोर आलं होतं. या पोर्टलवर नोंदणी करताना सुरुवातीला मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागतो. त्यानंतर एक ओटीपी त्या मोबाईल नंबरवर पाठवला जातो, मात्र हा ओटीपी येत नसल्याचं समोर आलं होतं. तसेच अनेक यूजर्सनी साईट ओपन होत नसल्याच्या देखील तक्रारी केल्या आहेत. दरम्यान तांत्रिक अडचणीनंतरही पहिल्या एका तासात कोविन ॲपवर 18 वर्षे वयावरील 35 लाख लोकांनी लसीसाठी नोंदणी केली असल्याची माहिती मिळाली आहे. 

काही मिनिटांमध्ये कोविन अ‍ॅपचा सर्व्हर डाऊन
नोंदणी प्रक्रिया चार वाजेपासून कोविन अ‍ॅपवर सुरु झाली. मात्र ही नोंदणी सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये कोविन अ‍ॅपचा सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती समोर आली होती. सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी यासंदर्भातील तक्रार नोंदवली असून स्क्रीनशॉर्ट पोस्ट केले जात आहेत. ट्वीटरवर वेटिंग फॅार ओटीपी, नो ओटीपी, स्लॅाट, ओटीपीज, अपॅाईंटमेंट असे ट्रेंड सुरु होते.  आरोग्य सेतू तसेच कोविन अ‍ॅपवरुन नोंदणी केली तरी मूळ नोंदणीसाठी कोविनच्या अ‍ॅपवरच नोंदणी करणाऱ्यांना रिडायरेक्ट केलं जात असल्याने कोट्यावधी युझर्स एका वेळी नोंदणीसाठी आल्याने सर्व्हर क्रॅश झालं होतं. 

आरोग्य मंत्रालयाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली होती की, तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी नोंदणी 28 एप्रिलपासून सुरू होईल. नोंदणी अधिकृत वेबसाइट COWIN.GOV.IN वर होईल. 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण 1 मे पासून सुरु होणार आहे. 

को-विन (CoWIN) पोर्टल अधिक कार्यक्षम केल्याची माहिती

कोविड 19 लस नोंदणीसाठी को-विन (CoWIN) पोर्टल देखील अधिक कार्यक्षम करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली होती. दररोज एक कोटी नोंदणी या पोर्टलवर स्वीकारली जाणार आहे. यासोबतच दररोज 50 लाख लोकांच्या लसीची नोंद होऊ शकते. 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचे लसीकरण 1 एप्रिलपासून सुरू केले जात आहे. त्यामुळे नोंदणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे या पोर्टलमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.

कोरोना लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रिया कशी आहे?

    • इथं तुमचा वैध मोबाईल क्रमांक टाईप करा. पुढं "Get OTP" या बटणावर क्लिक करा.
    • एका एसएमएसच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी देण्यात येईल.
    • ओटीपी तिथं दिलेल्या ठिकाणी क्लिक करुन "Verify" या बटणावर क्लिक करा.
    • ओटीपीची पडताळणी झाल्यानंतर तुम्ही "registration of Vaccination" अर्थात लसीकरणासाठीच्या नोंदणीच्या पेजवर पोहोचाल. इथे आवश्यक ती माहिती द्या.
    • सर्व माहिती दिल्यानंतर उजव्या बाजूच्या कोपऱ्यावर "Register" या बटणावर क्लिक करा. ज्यानंतर तुम्हाला नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा एक मेसेज येईल. Account details page वर असणाऱ्या कॅलेंडर या बटणावर क्लिक करुन किंवा "Schedule Appointment" वर क्लिक करुन लसीकरणासाठीची तारीख मिळवता येईल. इथं "Book Appointment for Vaccination page" असाही पर्याय दिसेल. ज्या ठिकाणी तुम्हाला हव्या त्या केंद्राची आणि वेळेची निवड करत लसीकरणासाठीचं हे पुढचं पाऊल टाकणं शक्य होईल.

 

इतर माध्यमातून नोंद करता येते का?
होय, आरोग्य सेतू आणि कॉमन सर्व्हिस अॅपच्या माध्यमातून कोविन या अॅपवर नोंद करता येते.

कोणत्या कागदपत्रांची गरज आहे?
ज्यांचे वय हे 45 वर्षावर आहे आणि त्यांना काही गंभीर आजार आहेत त्यांना लसीकरणासाठी नोंद करण्यासाठी आपल्याला गंभीर आजार असल्याचे मेडिकल सर्टिफिकेट सादर करावं लागणार आहे. या लोकांना तसेच ज्यांचे वय 60 वर्षावर आहे त्यांना आधार कार्ड, व्होटिंग आयडी नंबर अथवा अधिकृत फोटो आयडी नंबर द्यावा लागणार आहे.

लसीकरणासाठी आपण ठिकाण निवडू शकतो का?
होय, लसीकरणासाठी कोणत्याही राज्यात आपण नांव नोंद करु शकतो. त्या-त्या राज्याने ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस देण्यात येणार आहे त्यांची नावे जाहीर केली आहेत. त्या आधारे आपण आपल्याला सोयीच्या हॉस्पिटलची निवड करु शकतो. यामध्ये 20 हजार पेक्षा जास्त खासगी हॉस्पिटलची यादीही आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस ही 250 रुपयांना मिळणार आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये ही लस मोफत मिळणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar NCP Majalgaon : घोषणाबाजी आवरली नाही तर... अजित पवारांचा दमTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
EPFO Name Change : ईपीएफओ खात्यात नाव, जन्मतारीख कशी दुरुस्त करायची, संपूर्ण प्रक्रिया एका क्ल्किकवर
ईपीएफओ खात्यामधील नावात दुरुस्ती करण्याचं टेन्शन मिटलं, सोपी प्रक्रिया आणि कागदपत्रांची यादी
Embed widget