(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona vaccination : सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणारे हिमाचल प्रदेश बनलं देशातील पहिलं राज्य
Corona vaccination : हिमाचल प्रदेशने त्या राज्यातील सर्व प्रौढ नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा विक्रम केला आहे.
शिमला : देशात आतापर्यंत 127 कोटी नागरिकांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले असताना हिमाचल प्रदेशच्या नावे एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. राज्यातील सर्व प्रौढ नागरिकांना कोरोनाची लस देणारे हिमाचल प्रदेश हे देशातील पहिलेच राज्य ठरलं आहे. राज्यातील सरकारी सूत्रांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील सर्व नागरिकांना सर्वप्रथम पहिला डोस देण्याचा विक्रमही हिमाचल प्रदेशच्या नावेच आहे.
राज्यातील एकूण 53,86,393 प्रौढ नागरिकांना कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात हिमाचल प्रदेशने त्या राज्यातील सर्व नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला होता. आता एम्सकडून या राज्याचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
दरम्यान, आज एकाच दिवसात देशामध्ये एक कोटी लसीचे डोस देण्याचा विक्रमी कामगिरी केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनीही ट्वीट करत भारतीयांचं आभार मानले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात शनिवारी एक कोटी लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 127 कोटी 55 लाख 79 हजार 262 लसीचे डोस देण्यात आलं आहे. भारताने 24 तासांत 2.5 कोटी लोकांना लसीकरण करण्याचं ध्येय ठेवलं आहे.
भारतात ओमायक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या (coronavirus) संकटाची चिंता सतावत असतानाच आता कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटने (omicron variant) आणखी चिंतेत भर घातली आहे. देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. सर्वात आधी कर्नाटकात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले होते. त्यात आज गुजरात आणि महाराष्ट्राची भर पडली आहे. देशातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या चार झाली आहे.
संबंधित बातम्या :