एक्स्प्लोर

Honey Trap : नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक

West Bengal Terror Module Arpita Sarkar : पश्चिम बंगालच्या बर्धमानमधून एसटीएफने मोठी कारवाई केली असून 'जैश ए मोहम्मद'च्या ऑपरेटिव्हला त्याच्या गर्लफ्रेंडसह अटक केली आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालमधील राजकीय नेते आणि व्हीआयपी (VIP) व्यक्तींना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवून त्यांची संवेदनशील गुप्त माहिती गोळा करण्याचा एक अत्यंत मोठा कट स्पेशल टास्क फोर्सने (STF) उधळून लावला आहे. जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेशी संबंधित संशयित ऑपरेटर मोहम्मद हामिम मंडल याच्या अटकेनंतर, आता त्याच्या जवळच्या सहकाऱ्याला आणि प्रेयसीला म्हणजेच अर्पिता सरकार (Arpita Sarkar) हिला झारखंडच्या साहिबगंज येथून अटक करण्यात आली आहे.

अर्पिता सरकार हिला साहिबगंज येथून ताब्यात घेऊन बंगालमधील बर्धमान येथे आणण्यात आले आहे. या दोघांमध्ये व्हॉट्सॲपच्या माध्यमातून झालेला डिजिटल संवाद आणि चॅट एसटीएफने ( Bengal Special Task Force ) जप्त केले असून, त्यांच्या आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास सुरू आहे. दरम्यान, अर्पिता सरकार हिला 13 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

JeM Operative Arrested : भाड्याच्या घरातून आरोपीला अटक

विशेष पथकाने 30 जुलै रोजी बर्धमान शहरातील एका गृहनिर्माण संस्थेतील भाड्याच्या अपार्टमेंटमधून मोहम्मद हामिम मंडल (Hamim Mondal) याला बेड्या ठोकल्या होत्या. प्राथमिक तपासानुसार, मंडल हा आयएसआय (ISI) समर्थित दहशतवादी नेटवर्कचा भाग असल्याचा संशय आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्यांसह इतर प्रमुख राजकीय व्यक्तींची वैयक्तिक माहिती गोळा करणे, नवीन ऑपरेटिव्हची भरती करणे आणि संभाव्य दहशतवादी कारवायांसाठी पाया तयार करणे, हे काम त्याच्यावर सोपवण्यात आले होते.

Arpita Sarkar Honey Trap Strategy : नेत्यांना जाळ्यात ओढण्यासाठी महिलेचा वापर

पीटीआय (PTI) वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अनेक राजकीय नेत्यांची संवेदनशील व खासगी माहिती मिळवण्यासाठी एक विस्तृत जाळे तयार केले होते. या नेटवर्कमध्ये अर्पिता सरकार हिचा वापर नेत्यांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी केला जात होता. जप्त केलेल्या डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलीस या हनी ट्रॅप नेटवर्कचा कसून तपास करत आहेत.

Suvendu Adhikari Statement : मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांच्या ताफ्यावरही पाळत

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना हे अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरण असल्याचे म्हटले आहे. "वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि एसटीएफ या प्रकरणाचा तपास करत आहेत. संशयिताचे आंतरराष्ट्रीय धागेदारे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरुवातीच्या तपासात हा आरोपी माझ्या हालचालींवर आणि ताफ्याच्या मार्गावर पाळत ठेवून असल्याचे समोर आले आहे," असे त्यांनी सांगितले.

Terror Plot Investigation : हल्ल्याच्या नियोजनाचाही तपास सुरू

हनी ट्रॅपच्या माध्यमातून जमा करण्यात आलेल्या गोपनीय माहितीचा वापर पुढे मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन करण्यासाठी केला जाणार होता का, यादृष्टीनेही एसटीएफ अधिक तपास करत आहे. दोन्ही आरोपींची सध्या समोरासमोर चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
दिल्ली पेलेट गन हल्ला प्रकरण! राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, अखेर पोलिसांकडून FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरु 
दिल्ली पेलेट गन हल्ला प्रकरण! राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, अखेर पोलिसांकडून FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरु 
Advertisement

व्हिडीओ

Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget