जगण्याची प्रेरणा देणारा 'लव्ह यू झिंदगी' व्हायरल व्हिडिओतील मुलीचा संघर्ष अखेर थांबला!
आयसीयूमध्ये 'लव्ह यू झिंदगी' गाण्याचा आनंद घेणाऱ्या मुलीचा जगण्यासाठी चाललेला संघर्ष अखेर थांबला आहे.
कोरोना महामारीत अनेकांनी आपल्या जवळच्यांना गमावलं आहे. यातही काही मृत्यू असे आहेत जे जवळचे नसूनही मनाला चटका लावून गेलेत. अशीच एक घटना समोर आली आहे. 'लव्ह यू झिंदगी' व्हायरल व्हिडिओतील मुलीचा जगण्यासाठीचा संघर्ष अखेर संपला आहे. कोरोना झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये आयसीयूत (ICU) 'लव्ह यू झिंदगी' या गाण्याचा आनंद घेतनाचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. तिच्या मृत्यूची बातमी तिच्यावर उपचार करत असलेल्या डॉ. मोनिका लंगे यांनी ट्विट करत दिली आहे. या बातमीनंतर नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी तिच्याविषयी सोशल मीडियावर लिहलं आहे.
कोविड इमरजेंसी वॉर्डमध्ये शाहरुख खान आणि आलिया भट्ट स्टारर डियर जिंदगी यांच्या 'लव्ह यू झिंदगी' या गाण्याचा आनंद घेताना व्हिडीओत दिसत आहे.
I am very sorry..we lost the brave soul..
— Dr.Monika Langeh🇮🇳 (@drmonika_langeh) May 13, 2021
ॐ शांति .. please pray for the family and the kid to bear this loss🙏😭 https://t.co/dTYAuGFVxk
डॉ. लंगे यांनी गुरुवारी रात्री ट्विटरवर पोस्ट केलंय, की "मला माफ करा, आम्ही आमची शूर मुलगी गमावलीय.. ओम शांती. कृपया तिच्या कुटुंबासाठी आणि मुलांना हे दुःख करता यावे यासाठी प्रार्थना करा. ती पुढे म्हणाली, की "तिचे कुटुंब दुःख व्यक्त करीत आहे आणि आम्ही त्यांना ऑफर देऊनही त्यांनी कोणाकडूनही मदत घेतली नाही. मी सध्या बोलण्याच्या मनस्थितीत नाहीय.. मी तिच्याशी भावनिकरित्या जोडले गेले आहे. मला थोडा वेळ हवाय."
8 मे रोजी जेव्हा तिचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा त्या महिलेवर कोविड इमरजेंसी वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. तिला रेमडेसिवीर आणि प्लाझ्मा थेरपी करण्यात येत होती. त्यावेळी तिने इच्छाशक्ती वाढविण्यासाठी इमर्जन्सी वॉर्डमध्ये संगीत वाजवू शकते का? असे डॉ. लंगे यांना विचारले होते. त्यावर डॉक्टरांनी तिला परवानगी दिली होती.
She is just 30yrs old & She didn't get icu bed we managing her in the Covid emergency since last 10days.She is on NIVsupport,received remedesvir,plasmatherapy etc.She is a strong girl with strong will power asked me to play some music & I allowed her.
— Dr.Monika Langeh🇮🇳 (@drmonika_langeh) May 8, 2021
Lesson:"Never lose the Hope" pic.twitter.com/A3rMU7BjnG
10 मे रोजी डॉक्टरांनी सांगितले होते की तिच्यासाठी आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. "तिला आयसीयू बेड मिळाला पण प्रकृती स्थिर नव्हती. कृपया धाडसी मुलीसाठी प्रार्थना करा. कधीकधी मला खूप असहाय्य वाटते. आपल्या हातात काहीच नसल्याची भावना मनात येते. एक लहान बाळ तिची घरी वाट पहातंय.. कृपया प्रार्थना करा," असे डॉ. लंगे यांनी विनंती केली होती. 'लव्ह यू झिंदगी' मुलीच्या मृत्यूमुळे नेटिझन्स मनापासून दु: खी झाले आहेत.
एका वापरकर्त्याने सांगितले, "कभी कभी आशा टुट जाती है ऊपर वाले पर." दुसर्याने लिहिले, "भविष्यात जेव्हा कधी मी हे गाणं ऐकेल तेव्हा तिची आठवण नक्की येईल. ती कोण आहे आणि तिचे कुटुंब कुठं आहे हे माहित नाही, त्याने काही फरक पडत नाही. पण, हे गाणे आता तिचे आहे. तिचे कुटुंबाला हे सर्व सहन करण्यासाठी शक्ती द्या. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी देवाने त्या लहानग्यांना आशीर्वाद द्यावे!"
तिसर्या वापरकर्त्याने पोस्ट केलंय, की "हे खूप वेदनादायी आहे. फक्त वेदनादायी." अजून एकजण म्हणाला, "तुम्ही तिच्यासाठी हजारो प्रार्थना केल्या पण काहीच होऊ शकले नाही. तिच्याशी जे जोडले गेले त्या प्रत्येकाच्या आठवणीत ती कायम राहील."