एक्स्प्लोर
Coronavirus | देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 18 हजार पार, 590 जणांचा मृत्यू
लॉकडाऊनमुळे भारतात कोरोनाचे रूग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 18 हजार पार गेला असून महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक 4666रुग्ण आहेत.
नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य मंत्रालयानी दिलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनाबाधितांची संख्या 18 हजारांवर गेली आहे. सध्या देशातील 18 हजार 601 जणांना कोरोनाची लागण झाली असून 590 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 3252रुग्ण बरे झाले आहे. तर आरोग्य मंत्रालयाने सागितलं की, लॉकडाऊनमुळे भारतात कोरोनाचे रूग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला आहे. लॉकडाऊनआधी हा वेग 3.4 दिवस एवढा होता आता हा वेग 7.5 दिवसांवर पोहोचला आहे.
कोणत्या राज्यात किती जणांचा बळी?
आरोग्य मंत्रालयानी दिलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र मध्ये 232, मध्य प्रदेश 74, गुजरात71, दिल्ली 47, तमिळनाडू 17, तेलंगणा23, आंध्रप्रदेश 20, कर्नाटक 16, उत्तर प्रदेश 18, पंजाब 16, पश्चिम बंगाल 12, राजस्थान 25, जम्मू-कश्मीर 5, हरियाणा 3, केरळ 3, झारखंड 2, बिहार 2, आसाम, हिमाचल प्रदेश आणि ओडिसा मध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाग्रस्तांची राज्यनिहाय आकडेवारी
महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक 4666रुग्ण आहेत. यामध्ये सर्वाधिक मुंबईत 3032 लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यानंतर पुण्यात 594 लोक कोरोना बाधित आहेत. महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीमध्ये 2हजार रुग्ण आणि गुजरात तिसऱ्या क्रमांकावर असून त्याठिकाणी 1 हजार 851 रुग्ण आढळले आहेत. तर आंध्र प्रदेशमध्ये 722, अंदमान निकोबार 15, अरुणाचल प्रदेश 1, आसाम 35, बिहार 96, चंदिगढ 26, छत्तीसगढ़ 36, हरियाणा 233, हिमाचल प्रदेश 39, जम्मू-कश्मीर 350, झारखंड 42, कर्नाटक 395, केरळ 402, लद्दाख 18, मध्य प्रदेश 1485, मणिपुर 2, मेघालय 11, मिझोरम एक, ओडिसा में 68, पाँडेचेरी 7, पंजाब 219, राजस्थान 1478, तमिळनाडू 1477, तेलंगणा 873, त्रिपुरा 2, उत्तराखंड 44, उत्तर प्रदेश 1176 और पश्चिम बंगालमध्ये 339 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 2,481,026 वर पोहोचली आहे. आतापर्यंत या जीवघेण्या आजारामुळे 170,423 लोकांचा मृत्यू झाला आहे. वेबसाइट वल्डोमीटरने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेमध्ये 792,759, स्पेनमध्ये 200,210, इटलीमध्ये 181,228, फ्रान्समध्ये 155,383 कोरोना बाधित आहेत. तर आतापर्यंत अमेरिकेमध्ये 42,514, स्पेनमध्ये 20,852, इटलीमध्ये 24,114, फ्रान्समध्ये 20,265 आणि चीनमध्ये 4,632 लोकांचा मृत्यू झाला आहे.
संबंधीत बातम्या
जगभरात कोरोनाने घेतले 1.70 लाखांहून अधिक बळी; जाणून घ्या कोणत्या देशात काय परिस्थिती?
चिंता वाढवणारी बातमी! राज्यात 466 नव्या रूग्णांची भर; कोरोना बाधितांचा आकडा 4666 वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement