एक्स्प्लोर

भारतात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, 1100 पेक्षा जास्त जणांना लागण, 27 मृत्युमुखी

आत्तापर्यंत देशात एकूण 27 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर 90 जण कोरोना होऊन देखील बरे झाले आहेत.

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे देशात सहा जणांना आपला प्राण गमवावे लागले आहे. तर 106 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात एकूण 1100 हून जास्त जणांना कोरोनाची लागण झाली असून आज घडीला देशात 1136 कोरोनाग्रस्त आहेत. तर महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 203 वर पोहोचला आहे.

भारतात कोरोना व्हायरस पसरण्यास सुरुवात झाली आहे. देशात शनिवारीच कोरोनाग्रस्ताचा आकडा 1000 पार झालेला होता. केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. आत्तापर्यंत देशात 27 राज्यात कोरोना व्हायरस परला आहे. कोरोनामुळे देशात एकूण 27 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर 90 जण कोरोना होऊन देखील बरे झाले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 21 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केलं आहे. मात्र, दिल्लीतील एका बसस्टँडवर काल शनिवारी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. बिहार, उत्तर प्रदेश मधून आलेले हजारो कामगार याठिकाणी घरी जाण्यासाठी आले होते. परिमाणी सोशल डिस्टन्सिंग कशी पाळली जाईल, असा प्रश्न विचारला जात आहे.

Social distancing | गर्दी टाळण्यासाठी आदर्श घ्यावं असं भाजी मार्केट | विशेष रिपोर्ट

कोणत्या राज्यात किती मृत्यू

महाराष्ट्र 6

गुजरात 5

कर्नाटक 5

मध्य प्रदेश 2

तामिळनाडू, बिहार, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश प्रत्येकी 1

दरम्यान  जगभारात आत्तापर्यंत 6 लाख 80 हजार पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात एकूण 32,144 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर 1 लाख 46 हजार 396 लोक या आजारातून बरे झाले आहेत.

Coronavirus | देशभरात मोबाईल सेवा फ्री करा, प्रियंका गांधी यांची मागणी

अमेरिकेमध्ये चीनपेक्षा जास्त संसर्ग

अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसमुळे 1 लाख 23 हजार 750 बाधित आहेत. ज्यापैकी 2227 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये निर्माण झालेल्या या व्हायरसने आतापर्यंत 3300 लोकांचा बळी घेतला आहे. तर 81439 लोकांना संसर्ग झाला आहे. दरम्यान, चीनमध्ये आता नव्या रूग्णांची संख्या घटली असून 40 ते 50 रूग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.

इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दहा हजारांवर

इटलीमध्ये कोरोना व्हायरसने हैदोस घातला आहे. कारण शनिवारी 889 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा दहा हजार पार पोहोचला आहे. कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या इटलीमध्ये सर्वाधिक आहे. देशामध्ये या घातक आजारामुळे एकूण 10023 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये 92472 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP MajhaGavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget