Coronavirus | आळशी लोकांना कोरोनाचा धोका अधिक, संशोधनातून माहिती उघड
ब्रिटिश जरनल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनने आपल्या संशोधनाचा अहवाल जारी केला आहे. या संशोधनात सुमारे 50 हजार लोकांनी भाग घेतला होता.
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्या लाटेने देशभरात मोठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या दीड लाखांहून अधिक आहे. दररोज कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही वाढत आहे. या कठीण काळात आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नये आणि स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज व्यायाम केला पाहिजे. नियमित व्यायाम केला नाही, चालणे सुरु ठेवले नाही तर आरोग्याच्या समस्या उद्धभू शकतात असं एका संशोधनात समोर आलं आहे. कोरोनाची लागण आळशी लोकांना जास्त होण्याची शक्यता आहे आणि तसेच मृत्यू होण्याची शक्यताही जास्त आहे, असं संशोधनातून समोर आले आहे.
ब्रिटिश जरनल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनने आपल्या संशोधनाचा अहवाल जारी केला आहे. या संशोधनात सुमारे 50 हजार लोकांनी भाग घेतला होता. संशोधन अहवालानुसार कोरोना रूग्णांमध्ये व्यायामाअभावी अधिक गंभीर लक्षणे दिसू लागली होती आणि मृत्यूची शक्यता जास्त आहे. या संशोधनात सामील झालेल्या संशोधकांचे म्हणणे आहे की शारीरिकदृष्ट्या कमजोर असलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ ओढावली. संशोधनात जानेवारी ते ऑक्टोबर 2020 दरम्यान अमेरिकेतील 48,440 रूग्णांचा समावेश आहे. रुग्णांचे सरासरी वय सुमारे 47 वर्षे होते. या संशोधनात महिलांचाही समावेश होता.
Corona Vaccine | राजस्थानात कोरोना लस चोरीमुळे खळबळ; देशातील पहिलीच घटना
संशोधनात सामील झालेल्या जवळपास निम्म्या रूग्णांना कोणतेही आजार नव्हते. सुमारे 20 टक्के तरुणांना मधुमेह, फुफ्फुसाचे आजार, हृदय किंवा मूत्रपिंडाचे आजार किंवा कर्करोग सारखा आजार होता. 30 टक्के पेक्षा जास्त लोक एकाचवेळी दोन आजारांनी ग्रस्त होते. यापैकी 15 टक्के लोकांनी स्वत:ला आळशी असल्याचे सांगितले. सुमारे 80 टक्के लोकांनी कबूल केले की ते काही शारीरिक हालचाली (व्यायाम) करतात. पाच टक्के लोकांनी स्वत:ला तंदुरुस्त असल्याचे सांगितले. यामध्ये आळशी असणाऱ्या लोकांना रुग्णालयात भरती होण्याची शक्यता जास्त होती.
कोरोनाचा हाहाकार! केवळ 7 दिवसांत 10 लाखांहून अधिक नव्या कोरोना बाधितांची नोंद; हजारोंनी गमावले प्राण
मागील सात दिवसांची कोरोनाची स्थिती
13 एप्रिल : 184372 रुग्ण, 1027 मृत्यू
12 एप्रिल : 161736 रुग्ण, 879 मृत्यू
11 एप्रिल : 168912 रुग्ण, 904 मृत्यू
10 एप्रिल : 152879 रुग्ण, 839 मृत्यू
9 एप्रिल : 145384 रुग्ण, 794 मृत्यू
8 एप्रिल : 131968 रुग्ण, 780 मृत्यू
7 एप्रिल : 126789 रुग्ण, 685 मृत्यू
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 1 लाख 84 हजार 372 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर सध्या एकूण कोरोना बाधितांचा आकडा 1 कोटी 38 लाख 73 हजार 825 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 1 लाख 72 हजार 85 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.