कोरोना व्हायरस आला कुठून? चीनचे भारतातील राजदूत म्हणतात...
कोरोना व्हायरस भयंकर असला तरी व्हायरसबद्दलचे गैरसमज आणि अफवा त्याहून भयंकर असल्याचं चीनचे राजदूत सुन वीदोंग यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत कोरोन व्हायरसमुळे 1900 हून अधिक लोकांना मृत्यू झाला आहे, तर 72 हजारहून अधिक लोकांना याचा प्रादूर्भाव झाला आहे.
नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना व्हायरसची दहशत अजूनही कायम आहे. कोरोना व्हायरसमुळे मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. चीनने तयार केलेला व्हायरस चीनवरच उलटल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. चीनच्या वुहान लॅबमधून कोरोना व्हायरस निघाला असल्याचंही बोललं जात होतं. मात्र कोरोना व्हायरस मानव निर्मित नसून नैसर्गिक आहे, असं भारतातील चीनचे राजदूत सुन वीदोंग यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोना व्हायरस बाबत अद्याप पूर्ण माहिती देखील उपलब्ध नाहीये. कोरोना व्हायरस भयंकर असला तरी व्हायरसबद्दलचे अनेक गैरसमज आणि अफवा त्याहून भयंकर असल्याचं वीदोंग यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत कोरोन व्हायरसमुळे 1900 हून अधिक लोकांना मृत्यू झाला आहे, तर 72 हजारहून अधिक लोकांना याचा प्रादूर्भाव झाला आहे.
वीदोंग यांनी पुढे म्हटलं की, या गंभीर परिस्थितीत भारत आणि चीन यांच्यात संवाद कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती शी जिनपींग यांना पत्रही लिहीलं आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चीनच्या स्टेट काऊन्सलर यांच्याशी फोनवर चर्चाही केली आहे. भारतातील कोणत्याही नागरिकाला कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला नाही. चीनमधील विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यांना नियमित जेवण आणि मास्कसारखं गरजेचं सामान पोहोचवलं जात आहे.
Chinese Envoy to India: China & India have been keeping close communication on the epidemic. Recently PM Modi sent a letter of condolence to President Xi Jinping, expressing his recognition of the tremendous effort made by Chinese govt to deal with the outbreak. #Coronaviruus pic.twitter.com/SJ0eSiEOiw
— ANI (@ANI) February 18, 2020
Corona virus | कोरोना व्हायरसवर औषध सापडलं; थायलंडमधील डॉक्टरांचा दावा
कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही कोरोना व्हायरसची लढाई नक्की जिंकू. हुबेई प्रांतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या घटली आहे. रोज 5000 रुग्ण आढळणारी संख्या आता कमी होऊन 2000 आली आहे, असं वीदोंग यांनी म्हटलं.
वुहानमध्ये 10 दिवसात 10 मोबाईल रुग्णालये तयार करण्यात आली आहेत. याठिकाणी रोज सात हजार रुग्णांची तपासणी केली जात आहे. प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जावी, हा प्रयत्न आहे. 16 हजार लोकांच्या मदतीने वुहानमधील प्रत्येक घराचं सर्वेक्षण केलं जात आहे, जेणेकरुन कोरोनाच्या रुग्णांची माहिती मिळावी.
Corona Virus | चीनमधील कोरोना बाधितांच्या संख्येत घट, WHOची माहिती
कोरोना व्हायरस म्हणजे काय?