एक्स्प्लोर

Coronavirus : देशात कोविडमुळे 3 लाख मृत्युमुखी; अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात

कोरोनामुळे देशातील मृतांच्या आकडेवारीने आज तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या देशांमध्ये भारत जगात तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिका आणि ब्राझीलनंतर कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.

नवी दिल्ली : भारतात कोरोना संसर्गाच्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे देशातील मृतांच्या आकडेवारीने आज तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे कोरोनामुळे आतापर्यंत तीन लाखांपेक्षा जास्त मृत्यू झालेल्या देशांच्या यादीतही भारताचा समावेश झाला आहे. भारतासह या यादीत अमेरिका आणि ब्राझीलचाही समावेश आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासात 2 लाख 22 हजार 315 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर 4 हजार 454 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर 3 लाख 02 हजार 544 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. याआधी शनिवारी (22 मे) देशात 2 लाख 40 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती तर 3 हजार 741 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता.

जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे 35 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन लाख भारतीयांचा समावेश आहे. या हिशेबाने जगात कोरोनाने मृत्युमुखी पडणारा प्रत्येक तेरावा व्यक्ती भारतीय होता. ब्राझील आणि अमेरिकेनंतर कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. अमेरिकेते आतापर्यंत सुमारे सहा लाख आणि ब्राझीलमध्ये साडेचार लाख जणांना कोरोनामुळे बळी गेला. भारतात जगभरातील सुमारे 17 टक्के लोकसंख्या आहे.

देशात कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 1.13 टक्के आहे तर रिकव्हरी रेट 88 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. सक्रिय रुग्णांची संख्या घटून 11 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या स्थानावर आहे. एकूण बाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. 

राज्यांबद्दल बोलायचं झालं तर कोविडमुळे होणाऱ्या 73.88 टक्के मृत्यूंमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांचा वाटा आहे. सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले असून त्यानंतर कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा क्रम लागतो. दिवसाचा पॉझिटिव्हिटी दर कमी होऊन 11 टक्के झाला आहे.

देशात आतापर्यंत 19.49 कोटी नागरिकांना लस
देशात आतापर्यंत 19.49 कोटी जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे.  शनिवारी (22 मे) 18 ते 44 वयोगटातील 6 लाख 82 हजार 398 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. 37 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात एकूण 99 लाख 79 हजार 676 जणांना लस देण्यात आली आहे.

बिहार, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात 18 ते 44 वर्षे वयोगटाच्या 10 लाखांपेक्षा जास्त जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. एकूण 19,49,51,603 जणांना लस देण्यात आली आहे. यामध्ये 97,52,422 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला आणि 67,00,147 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra Special Report : कामराची कॉमडी, प्रेक्षकांना समन्स; पोलीस नोंदवणार प्रेक्षकांचे जबाबSuresh Dhas Full PC : कृषी केंद्राची कंत्राट अप्रत्यक्षपणे कृषी अधिकाऱ्यांकडेच : सुरेश धसSpecial Report Sanjay Raut : मोदींची सप्टेंबरमध्ये निवृत्ती,राऊतांची भविष्यवाणी;भाजप जाळ्यात अडकणार?Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Embed widget