Covid 19 : कोरोनाचा चढउतार सुरुच! आज कोरोना रुग्ण घटले, सक्रिय रुग्णांची संख्या 12 हजारांवर
Coronavirus in India : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 842 कोरोनाबाधित सापडले आहेत आणि सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases in India : एक दिवस आधी देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर आज रुग्णांची घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत नवीन 842 कोरोनाबाधित सापडले आहेत आणि सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल देशात 1016 नवीन कोरोना रुग्ण आणि दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या एक हजारांहून कमी आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सध्या 12 हजारांवर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे सुमारे पाच लाख 30 हजारहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
4 कोटीहून अधिक कोरोनामुक्त
भारतात एकूण चार कोटीहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. हा आकडा सध्या 4 कोटी 46 लाख 64 हजार 810 लोकांना कोरोनाची बाधा झाली. त्यामधील बहुतेक लोक बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण 5 लाख 30 हजार 520 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.देशात सध्या 12 हजार 752 सक्रिय कोरोना रुग्ण आहे.
India records 842 new coronavirus infections in single day, COVID-19 tally rises to 4,46,64,810, death toll climbs to 5,30,520: Govt
— Press Trust of India (@PTI_News) November 11, 2022
कोरोनाची पुन्हा लागण पहिल्या संसर्गापेक्षा धोकादायक
कोरोना विषाणूची पुन्हा लागण होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कोरोनाची पुन्हा लागण पहिल्या संसर्गापेक्षा धोकादायक असल्याचं अभ्यासात आढळून आलं आहे. कोरोनामुळे मृत्यूचा धोका कमी झाला असला तरी पुनर्संक्रमणामुळे लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे. गुरुवारी प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, पुन्हा कोरोना संक्रमण हे अधिक घातक आहे.
कोरोनासोबतच डेंग्यू आणि गोवर आजारांचा वाढता धोका
देशात एकीकडे कोरोना तर दुसरीकडे इतर विषाणूजन्य आजारांचा धोका वाढताना दिसत आहे. एकीकडे देशात डेंग्यू आणि गोवर यांसारख्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. याची लक्षणे ओळखून वेळीच उपचार घेणं अधिक महत्त्वाचं आहे. विशेषत: लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या, कारण हिवाळ्यात त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते.
चीनमध्ये कोरोनाचा कहर कायम
चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. चीनची राजधानी बीजिंगमधील एका वर्षातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामनुळे चीनमधील निर्बंध अधिक कठोर करण्यात येत आहेत. बीजिंगमध्ये गुरुवारी 114 नवीन प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.