Coronavirus : परदेशातून आलेले 200 हून अधिक प्रवासी कोरोनाबाधित, सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण
Coronavirus in India : परदेशातून भारतामध्ये आलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत.
Omicron Sub-Variant BF.7 In India : जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. यामुळे केंद्र सरकारकडून खबरदारीची पाऊले उचलली जात आहेत. परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची चाचणी केली जात आहे. दरम्यान, आतापर्यंत विमानतळावर आलेल्या प्रवाशांपैकी अनेक प्रवासी कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण ओमायक्रॉनचे आहेत. जगभरात सध्या ओमायक्रॉनच्या BF.7 आणि XBB 1.5 या व्हेरियंटचा संसर्ग वाढल्याचे दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली आहे.
सर्वाधिक रुग्ण ओमायक्रॉन व्हेरियंटचे
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी देशातील कोरोना परिस्थिती संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. देशातील विविध विमानतळांवर आतापर्यंत 15 लाखांहून अधिक प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 200 हून अधिक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवलेल्या त्यांच्या नमुन्यांमध्ये अनेक प्रवाशांमध्ये BF.7 व्हेरियंट आढळल्याचे दिसून आले.

गेल्या 24 तासांत 171 नवे रुग्ण
देशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे केवळ 171 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर एका दिवसात कोरोना लसीचे 50 हजारांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. देशातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा 4 कोटी 46 लाख 80 हजार 045 वर पोहोचला आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आतापर्यंत 5 लाख 30 हजार 722 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
#Unite2FightCorona#LargestVaccineDrive#AmritMahotsav pic.twitter.com/5R8BOYnLm5
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) January 11, 2023
एका दिवसात कोरोना लसीचे 50 हजारांहून अधिक डोस
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत कोरोना लसीचे 50 हजारांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत देशव्यापी लसीकरणात 220.14 कोटी लसी देण्यात आल्या आहेत. देशात सध्या 2319 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.