एक्स्प्लोर

Coronavirus | कोरोना व्हायरसचा भारतात पहिला बळी, कर्नाटकातील 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

जगातील तब्बल शंभरहून अधिक देशात कोरानाचा फैलाव आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून महारोगाईची घोषणा केली असून जगभरात आतापर्यंत साडेचार हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

बेंगलुरु: कोरोनाचा भारतात पहिला बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकातल्या कलबुर्गीमध्ये 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक राज्य सरकारने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.   कर्नाटक राज्य सरकारने गुरुवारी सांगितलं होतं की, या व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते. राज्याचे आरोग्य मंत्री बी. श्रीरामुलु यांनी ट्वीट करुन या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची माहिती दिली आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. तसेच या सर्व संपर्कात आलेल्या लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी व्यवस्था केली आहे. जगातील तब्बल शंभरहून अधिक देशात कोरानाचा फैलाव आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून महारोगाईची घोषणा केली असून जगभरात आतापर्यंत साडेचार हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या आता 14 वर पोहोचली आहे. ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी एक कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेले आहे. ठाण्यातील रुग्ण फ्रान्सवरून तर मुंबईतील रुग्ण दुबईहून आला होता. मुंबईतील रुग्णाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान कोरोना व्हायरस हा जगभरातील 111 देशांमध्ये पसरला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना व्हायरसने जगात महामारी म्हणून घोषित केलं आहे.

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या आता 12 झाली आहे. पुण्यात 9, मुंबईत 3, ठाणे आणि नागपुरात एक कोरोनाबाधित रूग्ण सापडला आहे. पुण्यातील नऊपैकी सात कोरोनाबाधित हे दुबईला फिरायला गेले होते, तर आठवा रुग्ण त्यांना मुंबई एअरपोर्टवरून पुण्याला घेऊन येणारा ड्रायव्हर होता. तसेच पुण्यातील नववा रूग्ण हा यांच्या संपर्कातील नसून हा रूग्ण एक मार्च रोजी अमेरिकेहून भारतात परतला होता. तसेच ठाण्यातील कोरोनाबाधित रूग्ण फ्रान्सवरून परतला आहे. अशातच मुंबईतील तिसरा कोरोनाबाधित रूग्ण वृद्ध असून तो दुबईवरून परतला आहे.

Corornavirus | जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना व्हायरस महामारी म्हणून घोषित

कोरोना व्हायरस महामारी म्हणून घोषित

कोरोना व्हायरस जगातील 111 देशांमध्ये फोफावला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात चार हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना व्हायरसला जगात महामारी म्हणून घोषित केलं आहे. तसंच कोरोनाविरोधात संपूर्ण जगाने आता एकजूट होऊन लढावं, असं आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेने केलं आहे.

पाहा व्हिडीओ : Coronavirus Test at Home | घरबसल्या कोरोना तपासा 10 सेकंदात | ABP Majha

परदेशातून येणाऱ्यांचे व्हिसा रद्द

परदेशातून भारतात येणाऱ्यांचे व्हिसा 15 एप्रिलपर्यंत सस्पेंड करण्यात आले आहेत. यामधून राजनीतीज्ञ आणि यूएन कर्मचाऱ्यांना वगळण्यात आलं आहे. चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीमधून येणारे भारतीय 14 दिवसांसाठी देखरेखीखाली असतील.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आर्थिक आयोगने 13 मार्च रोजी होणारी राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबतची बैठक रद्द केली आहे. एअर इंडियाने इटलीला जाणारी विमानं 28 मार्च आणि दक्षिण कोरियाला जाणारी विमानं 25 मार्चपर्यंत रद्द केली आहेत. इटलीमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 827 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 12462 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

IND Vs SA, Coronavirus | प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येणार भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेतील सामने

आयपीएलवर कोरोनाचं संकट

यंदा महाराष्ट्रात खेळले जाणारे आयपीएलचे सामने कदाचित स्टेडियमऐवजी फक्त टीव्हीवरच पाहायला लागणार आहेत. कारण कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आयपीएलच्या सामन्यांच्या तिकीट विक्रीवर बंदी आणण्याचा विचार सरकार गांभीर्याने करत आहे. तर, भारत सरकारने 15 एप्रिलपर्यंत पर्यटक व्हिसा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात खेळाडूंबद्दल स्पष्ट उल्लेख नसल्याने आयपीएलमध्ये खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंच्या उपस्थितीबाबत आता शंका व्यक्त होत आहे.

संंबंधित बातम्या : 

#CoronaVirus | कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार, शनिवारीच अधिवेशनाचा समारोप

Coronavirus | पुण्यानंतर मुंबईत कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण

Corona Virus | असंवेदनशीलतेचा कळस, कोरोना पीडित रुग्णाच्या कुटुंबाला वाळीत टाकलं

#CoronaVirus | महाराष्ट्रातील 11 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नाहीत, अधिकची काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : मुनगंटीवारांच्या नाराजीनाट्यामुळं काय बदललं? चंद्रपुरात भाजपचा सर्वांना खुश करणारा तोडगा
मुनगंटीवारांच्या नाराजीनाट्यामुळं काय बदललं? चंद्रपुरात भाजपचा सर्वांना खुश करणारा तोडगा
Mhada Pune Lottery : म्हाडा पुणेच्या 4186 घरांची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर, 2 लाख 15 हजार अर्जदार हवालदिल, अनामत रकमेच्या व्याजाचं काय असा सवाल 
म्हाडा पुणेच्या 4186 घरांची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर, 2 लाख 15 हजार अर्जदार हवालदिल
Rohit Sharma : विराट कोहलीचा छोटा चाहता मॅच संपताच धावत आला, रोहित शर्मानं एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली पाहा Video  
कोहलीचा छोटा चाहता मॅच संपताच धावत आला, रोहित शर्मानं एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली पाहा Video
Vasai Virar Election : वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार
वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार

व्हिडीओ

Nashik BJP VS Shiv Sena Thackeray :  आयारामांचं संकट? नाशिक भाजपात कटकट! Special Report
Sayaji Shinde Vanrai : सयाजींच्या वनराईवर कुणाची वाकडी नजर? Special Report
Municipal Corporation Election 2026 : महानगरपालिका निवडणुकीतही घराणेशाहीचा दबदबा Special Report
Prashant Jagtap NCP : प्रशांत जगताप काँग्रेसचा हात धरणार? अजितदादांमुळे काकाशी कट्टी... Special Report
Kishor Jorgewar Vs Mungantiwar : जोरगेवार भी खुश, मुनगंटीवार भी खुश? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : मुनगंटीवारांच्या नाराजीनाट्यामुळं काय बदललं? चंद्रपुरात भाजपचा सर्वांना खुश करणारा तोडगा
मुनगंटीवारांच्या नाराजीनाट्यामुळं काय बदललं? चंद्रपुरात भाजपचा सर्वांना खुश करणारा तोडगा
Mhada Pune Lottery : म्हाडा पुणेच्या 4186 घरांची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर, 2 लाख 15 हजार अर्जदार हवालदिल, अनामत रकमेच्या व्याजाचं काय असा सवाल 
म्हाडा पुणेच्या 4186 घरांची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर, 2 लाख 15 हजार अर्जदार हवालदिल
Rohit Sharma : विराट कोहलीचा छोटा चाहता मॅच संपताच धावत आला, रोहित शर्मानं एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली पाहा Video  
कोहलीचा छोटा चाहता मॅच संपताच धावत आला, रोहित शर्मानं एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली पाहा Video
Vasai Virar Election : वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार
वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार
भाजपचा तो पराभव माझ्यामुळे झाला तर आनंदाची बाब; एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार
भाजपचा तो पराभव माझ्यामुळे झाला तर आनंदाची बाब; एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार
Gold Rate : सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले? अधिक परतावा कुठं मिळणार? 
सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले?
Army Social Media Policy : सैन्य दलातील जवानांना इन्स्टाग्रामवर खातं उघडता येणार पण... 'या' गोष्टींना मनाई, भारतीय सेना दलाकडून नवे नियम
सैन्य दलातील जवानांना इन्स्टाग्रामवर खातं उघडता येणार पण... 'या' गोष्टींना मनाई, भारतीय सेना दलाकडून नवे नियम
पुण्यात एकहाती सत्ता राखण्यासाठी भाजपची खेळी; उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरला, जुन्यांना पुन्हा संधी
पुण्यात एकहाती सत्ता राखण्यासाठी भाजपची खेळी; उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरला, जुन्यांना पुन्हा संधी
Embed widget