एक्स्प्लोर
Advertisement
गूड न्यूज... कोरोनावरील भारतात बनलेली लस कोवाक्सिन 15 ऑगस्टपर्यंत लॉन्च होण्याची शक्यता
कोरोना व्हायरसवरील लस कोवाक्सिन (Covaxin) 15 ऑगस्टपर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे. ही लस तयार करत असलेल्या भारत बायोटेक कंपनीने लसीच्या लॉन्चिंगची तयारी केली आहे. 15 ऑगस्टपर्यंत या लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण करण्याचे निर्देश आयसीएमआर (ICMR) ने दिले आहेत.
नवी दिल्ली : भारतात तयार केली जात असलेली कोरोना व्हायरसवरील लस कोवाक्सिन (Covaxin) 15 ऑगस्टपर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे. ही लस तयार करत असलेल्या भारत बायोटेक कंपनीला 15 ऑगस्टपर्यंत या लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण करण्याचे निर्देश आयसीएमआर (ICMR) ने दिले आहेत. 7 जुलैपासून क्लिनिकल ट्रायल सुरु करावं. यासाठी उशीर केला जाऊ नये. या ट्रायलचे निष्कर्ष लवकर आल्यास 15 ऑगस्टपर्यंत लस लॉन्च केली जाऊ शकेल, असं आयसीएमआरनं म्हटलं आहे.
कोरोनाचा प्रादु्र्भाव जगभरात मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. भारतात देखील कोरोनाचा कहर वाढला आहे. अशात कोरोनावर औषधाबाबत काही आशेची किरणं दिसू लागली आहेत. भारतात तयार केली कोरोनावर लस शोधण्यात येत असून भारतीय औषधी महानियंत्रक (डीसीजीआय) ने मानवी चाचणीसाठी परवानगी दिली आहे. 'कोवॅक्सिन' नावाची लस भारत बायोटेकने इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही)सोबत एकत्र येऊन तयार केली आहे.
हैदराबादची फार्मास्यूटिकल कंपनी भारत बायोटेकने ही लस तयार केली आहे. भारतीय औषधी महानियंत्रक (डीसीजीआय) ने मानवी चाचणीसाठी परवानगी दिली होती 'कोवाक्सिन' नावाची लस भारत बायोटेकने इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही)सोबत एकत्र येऊन तयार केली आहे.
ICMR चे महासंचालक डॉ बलराम भार्गव यांनी एक पत्र जारी केलं असून यात 7 जुलैपासून या लसीची मानवी चाचणी सुरु होईल. यामुळं 15 ऑगस्टपर्यंत सामान्यांसाठी लॉन्च केलं जावं, असं म्हटलं आहे.
भारत बायोटेकने Covaxin च्या ट्रायलसह जायडस कॅडिला (Zydus Cadilla) या औषधाला देखील कोविड-19 वर इलाज म्हणून विकसित केलं आहे. या औषधाला देखील क्लिनिकल ट्रायलची परवानगी मिळाली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) यांनी COVID-19 वरील जायडस कॅडिला या औषधासाठी फेज 1 आणि फेज 2 मध्ये मानवी चाचणीला परवानगी दिलीय.
कोरोना जीवघेण्या व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. अशातच जगभरातील अनेक वैज्ञानिक या व्हायरसवर प्रतिबंध घालण्यासाठी लस शोधण्याचा प्रयत्नात आहेत. अशातच भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यान आज देशात पहिल्यांदाच कोरोनाबाधितांची संख्या 20 हजाराने वाढली आहे. देशात गेल्या 24तासांत कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार 903 ने वाढली तर मृतांचा आकडा 379 ने वाढला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 6 लाख 25 हजार 544 झाला आहे.
त्यापैकी एकूण 3 लाख 79 हजार 892 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 60.72 टक्के आहे. गेल्या 24 तासात 20 हजार 32 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 2 लाख 27 हजार 439 इतके आहेत. देशात एकूण कोरोनामुळं मृतांची संख्या 18 हजार 213 झाली आहे. 20 जुलै पर्यंत देशात 92 लाख 97 हजार 749 चाचण्या झाल्या आहेत.
पाहा व्हिडीओ : भारतातीय कोविड-19 लस 'Covaxin'ला क्लिनिकल ट्रायलची परवानगी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
मुंबई
निवडणूक
निवडणूक
Advertisement