Coronavirus : काळजी घ्या! देशात 196 नवे कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांचा आकडा तीन हजार पार; भारतातील कोरोनाची परिस्थिती सविस्तर वाचा...
Coronavirus Cases Update : जगात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असताना भारतातील परिस्थिती दिलासादायक आहे. देशात आज 196 नवे रुग्ण आढळले असून मागील 24 तासांत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
![Coronavirus : काळजी घ्या! देशात 196 नवे कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांचा आकडा तीन हजार पार; भारतातील कोरोनाची परिस्थिती सविस्तर वाचा... Coronavirus Cases Update India 196 New COVID-19 Cases One Death Reported Active Covid cases in country rise to 3428 Coronavirus Cases in India Coronavirus : काळजी घ्या! देशात 196 नवे कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांचा आकडा तीन हजार पार; भारतातील कोरोनाची परिस्थिती सविस्तर वाचा...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/26/b1107c64584d96bb633c836d14b7d1ea1672030312072470_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Coronavirus Cases in India : जगभरात कोरोनाचा उद्रेक (Coronavirus Outbreak) पाहायला मिळत असताना भारतातील परिस्थिती दिलासादायक आहे. देशात आज 196 नवे रुग्ण आढळले असून मागील 24 तासांत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा तीन हजार पार पोहोचला आहे. भारतातील कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. ही चांगली बाब असली तरी नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे तसेच बूस्टर डोस (Booster Dose) घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
केंद्र सरकारकडून सतर्कतेची पाऊले
सध्या देशात नवीन कोरोना रुग्णांची नोंद होण्याचे प्रमाण कमी आहे, पण इतर देशांमधील कोरोना परिस्थितीनुसार वाढता धोका पाहता केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून आवश्यक पाऊले उचलली जात आहेत. देशात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. आरोग्य प्रशासनाकडून दिल्ली विमानतळावर 500 हून अधिक प्रवाशांची रँडम कोविड चाचणी घेण्यात आली. सरकारकडून जीनोम सिक्वेंसिंग आणि RT-PCR चाचण्यांवर भर दिला जात आहे.
Union Health Minister Dr Mansukh Mandaviya will hold a meeting via video conferencing with the Indian Medical Association today on Covid19 situation and preparedness: Indian Medical Association
— ANI (@ANI) December 26, 2022
(IMA)
चीन, जपानसह इतर देशांमध्ये कोरोना संसर्ग वाढता
चीनमध्ये सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. चीनमध्ये दिवसागणिक लाखो नवीन रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनामुळो होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. चीनसह जपान आणि अमेरिकेतही कोरोना संसर्गाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याशिवाय भारताचा शेजारील देश पाकिस्तानमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.
'या' देशातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य
जगभरातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकार अलर्टवर आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची RT-PCR चाचणी करण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे.
नाकावाटे घेता येणार कोरोना लसीचा बूस्टर डोस
भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला (Covid Nasal Vaccine) बूस्टर डोस (Booster Dose) म्हणून वापराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता भारत बायोटेकची नेझल कोरोना वॅक्सिन कोविन (CoWin) ॲपवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. भारत बायोटेकची नाकावाटे देण्यात येणारी लस आता कोविन ॲपवर उपलब्ध आहे. भारत बायोटेकची iNCOVACC या इंट्रानेझल कोविड-19 लसीचा पर्याय कोविन ॲपवर (CoWin App) उपलब्ध करुन देण्यात आला आहे. दरम्यान कंपनीकडून अद्याप लसीची किंमत आणि उपलब्धता याबाबत माहिती जाहिर करण्यात आलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)