Covid19 : चिंताजनक! कोरोना विषाणूचा फैलाव वाढला; देशात 20 हजार 139 नवे कोरोनाबाधित, 38 रुग्णांचा मृत्यू रुग्ण
Coronavirus Cases Today : देशात कोरोना संसर्गात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 20 हजार 139 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today in India : जगासह देशभरातील कोरोनाचा फैलाव थांबण्याचं नाव घेत नाहीय. देशात कोरोना संसर्गात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 20 हजार 139 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी देशात 16 हजार 906 रुग्णांची नोंद आणि 45 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तुलनेत मृत्यूंची संख्या घटली असली तरी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही नवीन आकडेवारी जारी केली आहे.
सक्रिया रुग्णांची संख्या 1 लाख 36 हजारांपार
देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 482 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी दिवसभरात 38 जणांचा मृत्यू झाला. यासह कोरोनामुळे एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या 5 लाख 25 हजार 557 वर पोहोचली आहे. सध्या भारतात कोरोनाचे 1 लाख 36 हजार 76 सक्रिय रुग्ण आहेत. सध्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.31 टक्के आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.49 टक्के आहे. नव्या 16 हजार 482 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. यामुळे आतापर्यंत देशात एकूण 4 कोटी 30 लाख 28 हजार 356 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत.
लसीकरणाचा 199 कोटी लसींचा टप्पा पार
देशात कोरोना लसीकरण देशव्यापी पातळीवर सुरु आहे. देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 199 कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आल्या आहेत. देशात गेल्या 24 तासांत 3 लाख 94 हजार 774 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. देशात बुधवारपर्यंत एकूण 86 कोटूहून अधिक नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
#COVID19 | India reports 20,139 fresh cases, 16,482 recoveries, and 38 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) July 14, 2022
Active cases 1,36,076
Daily positivity rate 5.10% pic.twitter.com/XVzvVjsmjL
महाराष्ट्रात 2575 नव्या रुग्णांची भर, 10 जणांचा मृत्यू
बुधवारी महाराष्ट्रात 2575 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात 3210 जण कोरोनामुक्त होऊन बरे झाले तर, 10 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात बुधवारी 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून मंगळवारी ही संख्या 13 इतकी होती. राज्यातील मृत्यू दर हा 1.84 टक्के इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत 78,45,300 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.94 टक्के इतकं झालं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या