एक्स्प्लोर

Maharashtra Corona Update : राज्यात आज 2575 नव्या रुग्णांची भर, 10 जणांचा मृत्यू

Coronavirus : राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 1.84 टक्के इतका असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.94 वर पोहोचलं आहे. 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाची (Corona) रुग्णसंख्या काहीशी स्थिर असल्याचं चित्र असून राज्यात आज 2575 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आज 3210 जण कोरोनामुक्त होऊन बरे झाले आहेत. तर आज 10 रुग्णांचा मृत्यू झाला. 

राज्यात आज 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून मंगळवारी ही संख्या 13 इतकी होती. राज्यातील मृत्यू दर हा 1.84 टक्के इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत 78,45,300 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.94 टक्के इतकं झालं आहे. 

राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ही 16,922 इतकी असून सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या ही पुणे जिल्ह्यात असून ती 6222 इतकी आहे. त्या खालोखाल मुंबईचा क्रमांक असून मुंबईत 3006 सक्रिय रुग्ण आढळले आहेत.

पालघर येथे राज्यातील दुसरा झिका रुग्ण
पालघर येथील झाई गावातील आश्रम शाळेतील सात वर्षीय मुलीला झिका आजाराची लागण झाल्याचं समोर आलं आहे. राज्यात गेल्या वर्षी जुलैमध्ये पुण्यात झिकाचा पहिला रुग्ण आढळला होता. पुण्यातील प्रयोगशाळेत या मुलीचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले होते. त्या अहवालानंतर या मुलीला झिकाची लागण झाल्याचं दिसून आलं आहे.

अमरावतीमध्ये कॉलराचा उद्रेक
राज्यात सध्या पाऊस सुरू असून त्या पार्श्वभूमीवर साथ रोग सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. अमरावतीमध्ये कॉलरचा उद्रेक झाल्याचं समोर आलं असून आतापर्यंत 181 रुग्ण आढळले आहेत. 

देशातील स्थिती
गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 906 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच, 45 कोरोना रुग्णांचा मृत्यू (Corona Death) झाला आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 15 हजार 447 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशातच गेल्या 24 तासांतील नव्या रुग्णांच्या संख्येमुळं सध्याच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1 लााख 32 हजार 457 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, संसर्गाचा दैनिक दर 3.68 टक्के आणि साप्ताहिक दर 4.26 टक्के आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal Nanded News: सुखबीर सिंह बादल यांना एअरलिफ्ट करण्यात येणार; नांदेडमध्ये गुरद्वाराजवळ झालेला हल्ला, नेमकं काय घडलं?
सुखबीर सिंह बादल यांना एअरलिफ्ट करण्यात येणार; नांदेडमध्ये गुरद्वाराजवळ झालेला हल्ला, नेमकं काय घडलं?
Mumbai Taj Lands End vs BMC: ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget