(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, गेल्या 24 तासांत 2858 नवे रुग्ण
Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 2858 नवे रुग्ण आढळले असून 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 2858 नवे रुग्ण आढळले असून 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात माहिती प्रसिद्ध केली आहे. त्या आधी काल देशात 2841 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजार 96 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 3 हजार 355 कोरोना रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत 191 कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोना संसर्गाचा दैनंदिन सकारात्मकता दर 0.59 टक्के आहे. तर कोरोना संसर्गातून रुग्ण बरे होण्याचा दर 98.74 टक्क्यावर पोहोचला आहे.
देशाची राजधानी दिल्लीत सर्वाधित नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत दिल्लीत 899 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही मागील दोन महिन्यांमधील सर्वात जास्त कोरोनाबाधितांची संख्या आहे.
#COVID19 | India reports 2,858 fresh cases, 3,355 recoveries, and 11 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) May 14, 2022
Total active cases are 18,096
Daily positivity rate (0.59%) pic.twitter.com/ObQOxPWAhL
भारतात आतापर्यंत एकुण 4 कोटी 25 लाख 76 हजार 815 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत 5 लाख 24 हजार 201 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 11 रुग्णांनी कोविडमुळे प्राण गमावले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या