(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Covid 19 : देशात कोरोनाचा संसर्ग वाढला, सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजारांवर, मृत्यूंची संख्या घटली
Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 2745 नवे कोरोनाबाधित आढळले असून सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today in India : देशात कोरोनाचा कहर कायम आहे. एका दिवसाआधी कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्यानंतर आज पुन्हा कोरोना रुग्ण वाढले आहेत. देशात गेल्या 24 तासांत 2745 नवे कोरोनाबाधित आढळले असून सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात मंगळवारी दिवसभरात नव्याने नोंद झालेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 2236 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 4 कोटी 26 लाख 17 हजार 810 रुग्णांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली.
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र तुलनेनं कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मंगळवारी दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवशी 2338 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आणि 19 जणांचा मृत्यू झाला. देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाच लाखांच्या पुढे पोहोचली आहे. कोरोनामुळे भारतात एकुण 5 लाख 24 हजार 636 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) June 1, 2022
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/ORHPCJxCqi pic.twitter.com/N4oZpsnMOw
देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 193 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाचे महाराष्ट्रात 711 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीमध्ये कोरोनाचे 373 तर तामिळनाडूमध्ये 100 नवे रुग्ण सापडले आहेत. पश्चिम बंगालमध्ये 46 नवीन कोरोनाबाधित सापडले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजारांवर पोहोचली आहे. सध्या देशात 18 हजार 386 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या