Coronavirus : दिलासादायक! चार दिवसांनंतर कोरोना रुग्णांचा आलेख घटला, 51 रुग्णांचा मृत्यू
Coronavirus New Cases : देशात चार दिवसांच्या रुग्णवाढीनंतर कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. देशातील सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीबाबत जाणून घ्या.
Coronavirus Cases Today in India : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा आलेख वाढताना पाहायला मिळत असताना आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 935 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तुलनेनं कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात मागील चार दिवस दररोज वीस हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. पण आज कोरोना रुग्णांचा आलेख घसरला आहे. रविवारी दिवसभरात 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासांत 16,069 रुग्ण कोरोनामुक्त
देशात सध्या 1 लाख 44 हजार 264 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 16,069 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यासाह आतापर्यंत देशात 4 कोटी 30 लाख 97 हजार 510 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
200 कोटी कोरोना लसींचा टप्पा पूर्ण
दिवसेंदिवस रुग्ण वाढताना दिसत आहेत. यावर उपाय म्हणून सरकारकडून देशव्यापी कोरोना लसीकरणाची मोहिम राबवली. या पार्श्वभूमीवर भारताने मोठा विक्रम रचला आहे. देशव्यापी लसीकरणात भारताने 200 कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा टप्पा पूर्ण केला आहे. देशात 548 दिवसांमध्ये कोरोना लसीचे 200 कोटीहून डोस देण्यात आले आहेत.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) July 18, 2022
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/6l4i9p7y2v pic.twitter.com/rB7pudHl1C
महाराष्ट्रात नव्या व्हेरियंटचे रुग्ण
महाराष्ट्रात रविवारी 2186 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2179 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत सर्वाधिक म्हणजे 276 रुग्णांची भर पडली आहे. महाराष्ट्रात बी ए. 4 , बी ए. 5 व्हेरीयंटचे 19 रुग्ण तर बी. ए 2.75 चे 17 रुग्ण आढळले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- GST Rates Hike : महागाईचा भडका, आजपासून अन्नपदार्थांसह 'या' वस्तू महागणार
- भारतात फिरण्यासाठी आलेल्या अमेरिकन तरुणीनं रचली अपहरणाची खोटी कहाणी, पोलिसांनी 24 तासांत सोडवलं प्रकरण, नक्की काय घडलं?
- Petrol Diesel Prices : आज तुमच्या शहरांत एक लिटर पेट्रोलसाठी किती पैसे मोजावे लागणार? झटपट चेक करा लेटेस्ट दर