(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Awas Yojana : मध्य प्रदेशातील 5 लाख 21 हजार कुटुंबांना मिळणार स्वप्नांचं घर, पंतप्रधान मोदींच्या हस्ते गृहप्रवेश
Pradhan Mantri Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात 1 अप्रैल 2016 रोजी झाली. आतापर्यंत मध्य प्रदेशात या योजनेअंतर्गत 24 लाख 10 हजारांहून अधिक घरं बांधण्यात आली आहेत.
Pradhan Mantri Awas Yojana : आज मध्य प्रदेशातील पाच लाख कुटुंबांना त्यांच्या स्वप्नांचं घर मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गंत 5 लाख 21 हजार घरं लाभार्थ्यांना देणार आहेत. पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लाभार्थ्यांचा गृहप्रवेश करणार आहेत. यावेळी पंतप्रधान जनतेला संबोधित करतील.
गरीब कुटुंबांच्या पक्क्या घरांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न
देशातील प्रत्येक गरजू कुटुंबाला सर्व मूलभूत सुविधांसह पक्के घर देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी हे आणखी एक पाऊल आहे. या कार्यक्रमाअंतर्गत मध्य प्रदेशातील सर्व नवीन घरांमध्ये दिवे, फुले आणि रांगोळ्यांसह पारंपारिक उत्सव देखील आयोजित केले जाणार आहेत.
महिला सक्षमीकरणावर केंद्र सरकारचा भर
प्रधान मंत्री आवास योजना (ग्रामीण) (PMAY-G) योजनेच्या अंमलबजावणीत अनेक अनोख्या आणि नाविन्यपूर्ण उपक्रम पाहायला मिळत आहेत. यामध्ये महिला गवंडीसह हजारो गवंडींना प्रशिक्षण, फ्लाय अॅश विटांचा वापर, महिला बचत गट यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांना सशक्त बनवण्याचा या प्रकल्पांच्या मागचा उद्देश आहे.
काय आहे प्रधानमंत्री आवास योजना?
केंद्र सरकारतर्फे 1 एप्रिल 2016 रोजी प्रधानमंत्री आवास योजनेला सुरूवात करण्यात आली. मध्य प्रदेशमध्ये आतापर्यंत या योजनेअंतर्गत 24 लाख 10 हजारांहून अधिक घरे बांधण्यात आली आहेत. या योजनेचे उद्दिष्ट 2024 पर्यंत सर्व पात्र बेघर कुटुंबांसाठी आणि कच्चा घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांसाठी पक्की घरे बांधणे हे आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Bharat Band : भारत बंदचा दुसरा दिवस, पहिल्या दिवशी काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत; आरोग्य सेवांवर परिणाम नाही
- UP Cabinet : योगी सरकार 2.0, उत्तर प्रदेश सरकारचे खातेवाटप, जाणून घ्या कोणाला मिळालं कोणतं मंत्रिपद?
- PM Modi : 1 एप्रिल रोजी दिल्लीत 'परीक्षा पे चर्चा', पंतप्रधान मोदी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha