एक्स्प्लोर

Bharat Bandh : भारत बंदचा दुसरा दिवस, पहिल्या दिवशी काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत; आरोग्य सेवांवर परिणाम नाही

Bharat Band : केंद्रीय कामगार संघटनांनी सोमवारपासून पुकारलेल्या दोन दिवसीय देशव्यापी संपामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते.

Bharat Band : केंद्रीय कामगार संघटनांनी सोमवारपासून पुकारलेल्या दोन दिवसीय भारत बंदमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात हजारो कामगारांच्या दोन दिवसीय देशव्यापी संपाच्या पहिल्या दिवशी सोमवारी पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू सारख्या राज्यांतील अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प झाली होती. कामगार संघटनांनी पुकारलेल्या 48 तासांच्या देशव्यापी बंदनंतर केरळ उच्च न्यायालयाने सोमवारी सरकारी कर्मचाऱ्यांना संपात सहभागी होण्यास मनाई केली आणि राज्य सरकारला तातडीने आदेश जारी करण्याचे निर्देश दिले. 

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, छत्तीसगड, पंजाब, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यांसारख्या राज्यांच्या अनेक औद्योगिक भागात जोरदार निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्रात अनेक एटीएम मशीनमध्ये रोख रक्कम लगेच उपलब्ध होत नव्हती.

भारत बंदमध्ये राज्यातील 65 टक्के वीज कर्मचारी सहभागी
राज्यातील 65 टक्के वीज कर्मचाऱ्यांनी भारत बंदमध्ये सहभाग घेतला. केवळ 35 टक्केच कर्मचारी कामावर पोहोचले होते. मुख्य वीजप्रवाहात तांत्रिक सध्या सर्व यंत्रणा सुरळीत सुरू असल्यामुळे काही अडचण नाही.  मात्र अडचण आली तर याचा राज्यभरातील जनतेवर मोठा परिणाम दिसणार आहे. वीज कर्मचारी संपावर गेले असतानाच उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हा संप कर्मचाऱ्यांनी त्वरित मागे घ्यावा असे आवाहन केले आहे. 

7 हजार बँक शाखेतील 30 हजार कर्मचारी संपावर
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन सचिव देवीदास तुळजापूरकर यांनी प्रतिक्रिया देत सांगितले आहे की, ' 7 हजार बँक शाखेतील 30 हजार कर्मचारी संपावर आहेत. आयडीबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र बँकेतील कर्मचारीही संपावर आहेत. कर्मचाऱ्यांचा बँक खाजगीकरणाला विरोध आहे. ठेवीची सुरक्षितता हवी असेल तर हे आंदोलन आवश्यक आहे.

केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाचा मात्र आरोग्यसेवा आणि इंधन पुरवठा यासारख्या अत्यावश्यक सेवांवर कोणताही परिणाम झाला नाही. सरकारी कार्यालयांसह शैक्षणिक संस्थांमध्ये त्याचा परिणाम नगण्य होता. काही बँक शाखांमध्ये, विशेषत: मजबूत ट्रेड युनियन चळवळ असलेल्या शहरांमध्ये, 'ओव्हर-द-काउंटर' सार्वजनिक व्यवहार मर्यादित ठेवण्यात आले होते. 

केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने सांगितले की, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी देशव्यापी संपामुळे किमान आठ राज्यांमध्ये बंदची परिस्थिती निर्माण झाली. संयुक्त मंचाने सांगितले की, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओदिशा, आसाम, हरियाणा आणि झारखंडमध्ये बंदसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
NEET Exam : मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
विलासराव ते अहमद पटेलांपर्यंत, काँग्रेसचे राष्ट्रीय 'संकटमोचक', 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'मध्ये भाजपची ऑपरेशन लोटसची डाळ शिजू दिली नाही; जेलमध्ये जाऊनही डगमगले नाहीत, कोण आहेत डीके शिवकुमार?
विलासराव ते अहमद पटेलांपर्यंत, काँग्रेसचे राष्ट्रीय 'संकटमोचक', 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'मध्ये भाजपची ऑपरेशन लोटसची डाळ शिजू दिली नाही; जेलमध्ये जाऊनही डगमगले नाहीत, कोण आहेत डीके शिवकुमार?

व्हिडीओ

Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Iran War Live Update: अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
Riteish Deshmukh on Raja Shivaji: रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
Chhatrapati Sambhajinagar : अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड

Embed widget