Corona India Update | देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 31 हजारांवर, 54 हजारांहून अधिक कोरोनामुक्त
कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. भारतात देखील याचा प्रादुर्भाव वाढतोय. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 31 हजारांवर गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतात 54 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.देशातील कुठल्या राज्यात कोरोनाची काय स्थिती आहे? जाणून घ्या...

विविध राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या केरळमध्ये 795 रुग्ण त्यातील 515 बरे झाले. 4 मृत. गेल्या दहाबारा दिवसात केरळमध्ये रुग्णांची संख्या हळूहळू वाढतेय त्यामुळे रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवरुन 70 टक्क्यांवर आला आहे.
महाराष्ट्रा खालोखाल टॉप सात राज्य
तामिळनाडू 15512 रुग्ण, 7491 बरे झाले, मृतांचा आकडा 103 , रिकव्हरी रेट 48.29 टक्के
गुजरात 13664 रुग्ण, 6169 बरे झाले, मृतांचा आकडा 829, रिकव्हरी रेट 45.14 टक्के
दिल्ली 12910 रुग्ण, 6267 बरे झाले, मृतांचा आकडा 231, रिकव्हरी रेट 48.54 टक्के
राजस्थान 6742 रुग्ण, 3786 बरे झाले, मृतांचा आकडा 160 , रिकव्हरी रेट 56.15 टक्के
मध्यप्रदेश 6371 रुग्ण, 3267 बरे झाले, मृतांचा आकडा 281, रिकव्हरी रेट 51.27 टक्के
उत्तरप्रदेश 6017 रुग्ण, 3406 बरे झाले, मृतांचा आकडा 155, रिकव्हरी रेट 56.60टक्के
पश्चिम बंगाल 3459 रुग्ण, 1281 बरे झाले , मृतांचा आकडा 269, रिकव्हरी रेट 37.03 टक्के
जगभरात 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 54 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. मागील 24 तासात जगातील 213 देशांमध्ये 97897 नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 5,401,612 लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 343,804 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 2,247,151 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 75 टक्के कोरोनाबाधित हे केवळ बारा देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 41 लाखांच्या घरात आहे. कोणत्या देशात किती कोरोनाबाधित- अमेरिका: कोरोनाबाधित- 1,666,828, मृत्यू- 98,683
- ब्राझील: कोरोनाबाधित- 347,398 , मृत्यू- 22,013
- रशिया: कोरोनाबाधित- 335,882 , मृत्यू- 3,388
- स्पेन: कोरोनाबाधित- 282,370 , मृत्यू- 28,678
- यूके: कोरोनाबाधित- 257,154 , मृत्यू- 36,675
- इटली: कोरोनाबाधित- 229,327 , मृत्यू- 32,735
- फ्रांस: कोरोनाबाधित- 182,469 , मृत्यू- 28,332
- जर्मनी: कोरोनाबाधित- 179,986, मृत्यू- 8,366
- टर्की: कोरोनाबाधित- 155,686 , मृत्यू- 4,308
- इरान: कोरोनाबाधित - 133,521, मृत्यू- 7,359























