CoronaVaccine Update: केंद्र सरकारकडून अखेर सीरम इन्स्टिट्यूटला कोव्हिशिल्ड डोस पुरवण्याची ऑर्डर
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीला आता वितरणासाठी अखेर केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाला पहिल्या टप्प्यात एक कोटी दहा लाख इतके डोस पुरवण्याची ऑर्डर केंद्र सरकारकडून दिली गेली आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने अखेर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड या लसीचा डोस पुरवण्याची परवानगी दिली आहे. या लसीच्या वितरणासाठी पहिली ऑर्डर तब्बल एक कोटी दहा लाख इतके डोस पुरवण्याची आहे. केंद्र सरकार ही लस एका डोसमागे दोनशे रुपये या दराने सीरम इन्स्टिट्युटकडून खरेदी करणार आहे. उद्या सकाळी 10 वाजल्यापासून लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटमध्ये सध्या कोव्हिशिल्ड लसीचे पाच कोटी डोस तयार आहेत. परंतु हे पूर्ण पाच कोटी न पुरवता सध्या पहिल्या टप्प्यात फक्त एक कोटी दहा लाख डोस पुरवण्याचीच ऑर्डर केंद्र सरकारने दिली आहे.
सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपातकालीन वापरासाठी मंजुरी मिळाली. कोविशिल्ड लस वापरासाठी 23 हजार परदेशी नागरिकांवरचा क्लिनिकल डेटा प्राथमिक टप्प्यात सादर करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या क्लिनिकल फेजमध्ये देशात 1600 लोकांवर चाचणी करण्यात आली. ही लस 70.42 टक्के प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत 4 कोटी डोसची निर्मिती झाली आहे. सिरम इन्स्टीट्यूटने ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे. सर्व सामान्य जनतेला परवडेल अशीच लशीची किंमत असणार आहे. जुलै 2021 पर्यंत 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध करणार असंही पुनावाला यांनी स्पष्ट केलं. कोरोनावरील लसीवर संशोधन करणाऱ्या ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना एप्रिल महिन्यात प्राथमिक यश मिळाल्यावर लगेच त्या फॉर्म्युलाचा उपयोग करून सीरम इन्स्टिट्यूटने कोरोनावरील कोव्हीशील्ड या लसीचे डोस बनवणं सुरु केलं.
कोरोना लसीच्या चाचण्या पूर्ण होण्याआधीच सीरम इन्स्टिट्यूटने लस निर्मिती सुरू करुन आणि त्यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करुन एक प्रकारे जुगार खेळला होता. ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून तयार करण्यात येत असलेल्या लसीच्या चाचण्या यशस्वी होत गेल्या आणि सीरम इन्स्टिट्यूटकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या. सीरम इन्स्टिट्यूटचा कारभार मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आता अदर पुनावाला पाहतात. सीरम इन्स्टिट्यूटकडून तयार करण्यात येत असलेल्या लसीपैकी नव्वद टक्के लस ही सुरुवातीला भारतीय लोकांना दिली जाईल असं अदर पुनावाला यांनी जाहीर केलंय. ही एक लस सरकारला अडीचशे रुपयांना खरेदी करावी लागेल, असंही त्यांनी सांगितलं आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी कोरोना लशीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. अदर पूनावाला म्हणाले, वॅक्सीन पूर्णपणे सुरक्षित आहे. सरकारसाठी आम्ही लस खास किंमतीमध्ये देणार असून लशीची किंमत 180 ते 240 रुपये प्रती डोस असणार आहे. त्यानंतर आम्ही खासगी बाजारात लस आणू तेव्हा त्या लशीची किंमत 430 ते 580 रुपये असणार आहे. येत्या आठवड्यांमध्ये कोविशिल्ड येत्या आठवड्यांमध्ये बाजारात उपलब्ध होईल, अशी माहिती त्यांनी दिली.