(Source: ECI/ABP News/ABP Majha)
केरळमध्ये कोरोना लस मोफत दिली जाणार; मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची घोषणा
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी राज्यात कोरोना लस विनामूल्य देण्याची घोषणा केली आहे. केरळमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. शनिवारी केरळमध्ये कोरोना संक्रमित 5,949 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 32 लोकांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली : केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. कोरोना विषाणूची लस राज्यातील लोकांना विनाशुल्क दिली जाणार आहे. अनेक लसी उत्पादकांनी लसीच्या तातडीच्या वापरासाठी डीसीजीआयकडे परवानगी मागितली आहे. मात्र, अद्यापपर्यंत सरकारने कोणत्याही लसीला ग्रीन सिग्नल दिला नाही.
कोणत्या कंपन्यांनी आपत्कालीन लसीचा वापर करण्यास अर्ज केलेत?
अमेरिकेच्या फार्म सेक्टर कंपनीतील दिग्गज फायझरसह सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ने कोविड -19 लस 'कोविशिल्ड' या देशात विकसित लसीच्या आपातकालीन वापरासाठी डीसीजीआयकडे मान्यता मागितली आहे.केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय
शनिवारी केरळमध्ये कोरोना संक्रमित 5,949 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यात संक्रमणाची एकूण संख्या 6.64 लाखांवर गेली आहे तर मृत्यूची संख्या 2,594 वर पोहचली आहे.
आज 5,268 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, ज्यामुळे राज्यात आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची संख्या 6,01,861 पर्यंत वाढली आहे, तर सध्या 60,029 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात एकूण कोरोना केसेस वाढून 6,64,632 वर गेली आहेत.
या रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री विजयन यांनी केले आहे. ते म्हणाले की, खबरदारी घेतली नाही तर राज्याची अवस्था आणखी बिकट होईल.
संबंधित बातम्या :
Maharashtra Corona Vaccination Process: कोविड लसीकरणाची ब्ल्यू प्रिंट 'माझा'च्या हाती, असा आहे लसीकरणाचा मेगाप्लान Corona Vaccine | भारतात 8 कोरोना लसींवर क्लिनिकल ट्रायल सुरु; कोणत्या टप्प्यांत पोहोचली लसींची चाचणी?