कोरोना लसीकरणानंतर मास्क, सोशल डिस्टन्सिंग राहणार का?
अमेरिकेच्या फायझर आणि जर्मनीच्या बायोटेक या कंपनींच्या लसीकरणात दोन डोस दिले जणार आहेत. मात्र, लसीकरणानंतर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग राहणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
ब्रिटन आणि रशियासह काही देशांमध्ये कोरोनाची लस आता लोकांना दिली जात आहे. अशी अपेक्षा आहे की येत्या काही आठवड्यात भारतातही कोरोना लसीचं लसीकरण सुरू होईल. दरम्यान, कोविड 19 लस घेतल्यानंतर मास्क घालण्याची गरज भासणार का? लसीकरणानंतरही सोशल डिस्टन्स आवश्यक राहील का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. मात्र, लसीकरणानंतरही लोकांना पुढील काही दिवस मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा सल्ला जाईल.
अमेरिकेच्या फायझर आणि जर्मनीच्या बायोटेक या कंपनींनी विकसित केलेल्या लसीचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. फायझरच्या पहिल्या लसीकरणानंतर, पुढील लस तीन आठवड्यांनंतर दिली जाणार आहे. तर, मॉडर्ना लसीच्या पहिल्या डोसच्या चार आठवड्यांनंतर, लसीचा दुसरा डोस दिला जाईल. लसीचा सहसा त्वरित परिणाम होत नाही.
Corona Vaccine | भारताला कोरोना लसीसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार; काय आहे कारण?
कोरोना लसीच्या पहिल्या लसीकरणानंतर पुढील काही आठवड्यानंतर लोक त्यातून काही प्रमाणात संरक्षण मिळवण्याची अपेक्षा करीत आहेत. मात्र, लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर पुढील काही आठवड्यांत संपूर्ण बचाव शक्य होईल.
वॉशिंग्टन विद्यापीठाच्या लस तज्ज्ञ, डेबोरा फुलर म्हणाले: "फायझर आणि मॉडर्नाची लस कोरोना विषाणूच्या संसर्गापासून पूर्णपणे संरक्षण देते की फक्त त्याच्या लक्षणांबद्दल अद्याप हे पूर्णपणे उघड झाले नाही." याचा अर्थ असा आहे की लस घेतल्यानंतरही लोक संक्रमित होऊ शकतात. याचा प्रसारही लस घेतलेल्या व्यक्तीमार्फत होऊ शकतो. मात्र, अशा शक्यता फार कमी आहेत.
लसीचा पुरवठा वाढला तर पुढील काही दिवसांत कोट्यावधी लोकांना लस देण्याची अपेक्षा आहे. फुलर म्हणाले की, लसीची चाचणी मुलांवर सुरू झाली आहे. जोपर्यंत अभ्यासाच्या आकडेवारीनुसार ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे स्पष्ट होत नाही. तोपर्यंत लस मुलांना दिली जाणार नाही.
Corona Vaccine | महाराष्ट्रात प्रत्येकाला कोरोनाची लस कशी मिळणार? थेट रुग्णालयातून ग्राऊंड रिपोर्ट